सात्रळ/वेबटीम:- सात्रळ पंक्रोशीतील अग्रगण्य असलेली तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील व नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील य...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ पंक्रोशीतील अग्रगण्य असलेली तसेच आमदार राधाकृष्ण विखे पाटील व नगर दक्षिण चे खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्याशी मार्गदर्शन खाली कार्यरत असलेली सात्रळ ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ने संस्था चे सभासद व कर्मचारांची दिवाळी गोड केली असल्याने सभासद व कामगार आनंदात आहेत.
सोसायटीच्या 491 सभासदांना 12 टक्के डिविडेंड मिळणारं असून , कर्मचारांनाही दोन महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळणार आहे. सभासद, शेतकरी, ग्रामस्थ केंद्रस्थानी मानून संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी म्हणून संस्थेने सी सी टीव्ही कॅमेरे बसविले असून संस्थेचे कामकाज पूर्णपणे संगणीकृत केलेले असून एक आदर्श निर्माण केला आहे. सोसायटी च्या धान्य विभाग, खत डेपो, हेड ऑफिस मिळून झालेल्या नफ्यातून डिविडेंड वाटप संस्थेचे जेष्ठ संचालक ऍड. बाळकृष्ण चोरमुंगे, दिलीपराव डुकरे, कारभारी ताठे व संस्थेचे चेअरमन वसंतराव डुकरे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी सोसायटी चे उपाध्यक्ष संजय नागरे, संचालक गुलाबराव घोलप, कैलासराव डुकरे, चांगदेवराव दिघे, चांगदेव पडघलमल, मनीषाताई प्रकाशराव ताठे, उज्ज्वलाताई विजय डुकरे, परशराम साबळे, टी. के. शिंदे तसेच सोसायटी चे सचिव निवृत्ती शिंदे, दिलीप म्हैसेकर, अनिल मुसमाडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत