राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सुधारित सातबारा वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सुधारित सातबारा वाटप

राहुरी/वेबटीम:- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने घरपोहोच मोफत सुधारित सातबा...

राहुरी/वेबटीम:-

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने घरपोहोच मोफत सुधारित सातबारा वाटप मोहिमेचा शुभारंभ २ ऑक्टोबर रोजी कात्रड (ता. राहुरी) ग्रामपंचायत येथे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या शुभहस्ते व उपविभागीय अधिकारी डॉ.दयानंद जगताप व राहुरी तहसीलदार एफ.आर.शेख  यांच्या उपस्थितीत  पार पडला. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार एफ.आर शेख यांनी महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना घरपोहोच मोफत डिजिटल सातबारा देणे ,तसेच सध्या सर्वत्र ई पीक पाहणी मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून राहुरी तालुक्यात प्रांतअधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी , तलाठी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.ग्रामस्थांना त्यांनी शासनाच्या आपली चावडी बाबत माहिती दिली. तसेच शासनाच्या ईहक्क प्रणाली बाबत कोणकोणत्या बाबी संदर्भात शेतकरी ऑनलाइन अर्ज करू शकतात तसेच पोट खराबा क्षेत्र वहिती योग्य क्षेत्रा मध्ये कसे रूपांतरित करता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

.



 राज्यमंत्री ना.प्राजक्त  तनपुरे यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मोफत सातबारा ,शिधापत्रिका, उत्पन्न दाखले यांचे वाटप करण्यात आले.सदर उपक्रम सामान्य माणसाच्या ,शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा व गरजांशी निगडित असून त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत असल्याबाबत प्रतिक्रिया राज्यमंत्री ना.प्राजक्त दादा तनपुरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत