कोपरगाव प्रतिनिधी:- जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे तसेच उपसरपंच प्रभाकर विठ्ठल मांजरे या...
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा बँकेचे संचालक व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे तसेच उपसरपंच प्रभाकर विठ्ठल मांजरे यांचे उपस्थितीत अविनाश बाळासाहेब आहिरे, अमोल आहिरे,आकिल शेख, सूरज आहिरे यासह धामोरीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या फसव्या धोरणाला झुगारत,सत्तेत येऊन विरोधकांनी कुठलेही ठोस आश्वासन पूर्ण केले नाही याबद्दल तीव्र रोष व्यक्त करत खऱ्या अर्थाने विकासासाठी झटणाऱ्या कोल्हे कुटूंबियांवर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
श्री विवेक कोल्हे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आपली एकी अशीच राहिली तर येणाऱ्या सर्व निवडणूका आपण जिंकणार आहे यात मला शंका नाही,धामोरी गावाने कधीही कोल्हे कुटूंबाची साथ सोडलेली नाही कायमच कोल्हे कुटूंबासोबत राहिलेले गाव म्हणून धामोरी सर्व निवडणूकित दिसून आले आहे. फारसे प्रयत्न न करताही मोठे मताधिक्य अनेक निवडणूकित धामोरीने दिलेले आहे.सर्वाधिक संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक या येणाऱ्या काही महिन्यात पार पडणार आहे व मला खात्री आहे की त्यातही जनता जनार्दन आपल्या सोबत आहे,त्यांच्या विश्वासावर व तुमच्या सर्वांच्या साथीने आपण भरघोस यश मिळवणार आहोत. गेले दोन वर्षे मतदारसंघात फक्त फोटोसम्राट म्हणून विरोधकांनी ख्याती मिळवली आहे,विकास होत नाही फक्त नौटंकी आणि प्रसिद्धी यातच वेळ चाललं आहे त्यामुळे त्यांना कंटाळून ही अनेक मंडळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, श्री.बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे यांनी नेहमी जनविकासाची कामे केली व सत्ता असो की नसो कोल्हे कुटूंबाने कायम जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे या प्रेरणेने अनेकांकडून विश्वास दाखवत प्रवेश होत आहेत व धामोरी प्रमाणेच अशी परिस्थिती सर्वत्र आहे.अनेक नागरीक वैतागुण लोकप्रतिनिधी विरोधात रोष व्यक्त करत आहेत.
समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन आपण येणाऱ्या काळात आपल्या घवघवीत विजयाचा गुलाल घेणार आहोत..नव्याने पक्षप्रवेश केलेल्या सर्वांच्या माध्यमातून भरीव कार्य होईल,पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन अनेक भरीव कामे युवकांचे मजबूत संघटन करत आपण करणार आहोत यासाठी मी नेहमी आपल्या सर्वांच्या सोबत आहे असा विश्वास दिला व नूतन प्रवेश करणाऱ्या सहकाऱ्यांचे त्यांनी स्वागत केले.
श्री विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, दोन वर्षांपासून विविध समस्या तालुक्यात तशाच आहेत, कुठल्याही प्रकारे दिलेली आश्वासने पूर्ण झालेली नाहीत,एकही ठोस काम मतदारसंघात झाल्याचे चित्र नाही अशा निष्क्रिय कारभाराला जनता वैतागली असून रोष व्यक्त करत आहे.केवळ फोटोसेशन करायचे आणि प्रत्यक्षात काहीही काम न करता जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून चर्चेत राहायचे असा गोजिरवाना प्रकार सध्या सत्ताधाऱ्यांचा सुरू आहे हे वास्तव आहे.फसवी आश्वासने द्यायची व पूर्ण करण्याची वेळ आली की आयत्या मंजूर कामांचे जाऊन छायाचीत्रे काढायचे हे प्रकार जनतेने ओळखले आहे त्यामुळे सत्ताधारी हे आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहेत.कोल्हे कुटूंबाच्या माध्यमातून झालेली विकासकामे व आजही स्नेहलताताई कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर असलेली रस्ते,सामाजिक सभामंडप,विविध पाणीपुरवठा योजना यांचे कामे सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या काळात शेतीचे पाण्याचे रोटेशनचा खेळखंडोबा,अतिवृष्टी झाली तर कवडीचा मोबदला या सरकारच्या काळात मिळत नाहीये हे चित्र मनाला वेदना देणारे आहे असे ते म्हणाले.
विजयजाधव साहेब यांची महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या संचालकपदी फेरनिवड झाली त्यत्त्यबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत