कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहराच्या नागरी समस्या म्हणजे प्रस्तापित राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोरखेळ झाला असून खरोखर कोपरगाव शहराचा विकास करा...
कोपरगाव/वेबटीम:-
कोपरगाव शहराच्या नागरी समस्या म्हणजे प्रस्तापित राजकीय नेत्यांच्या दृष्टीने पोरखेळ झाला असून खरोखर कोपरगाव शहराचा विकास करायचा असेल तर शहर विकास या मुद्द्यावर समविचारी लोकांनी एकत्र यावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहराच्या नियमित पिण्याचे पाणी,सुंदर रस्ते,स्वच्छ गटारी या हातावर मोजणाऱ्या समस्या आहेत मात्र या समस्येचे प्रस्तापित नेत्यांकडून वर्षानुवर्षे केवळ आणि केवळ निवडणुकीत भांडवल केले जाते मात्र या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केले जात नाहीत या समस्याचा प्रस्तापित नेत्यांनी पोरखेळ करून ठेवला असून नागरिक वारंवार मागणी करून देखील या समस्या सोडवण्यात व करदात्या जनतेला सुख सुविधा देण्यात प्रस्तापित नेत्यांना अपयश येत आहे.
मागील नगर पालिका निवडणुकीत या समस्या डोळ्यासमोर ठेऊन जनतेने दोन्ही प्रस्तापित नेत्यांचे उमेदवार नाकारून निवडणूक हातात घेतली मात्र सर्वाधिक मतांनी विजयी होऊन देखील लोक प्रिय नगराध्यक्ष हे सुख सुविधा देण्यात अपयशी ठरले असून त्यामुळे जनतेच्या भ्रमनिरास झाला
कोपरगाव शहरातील नगर पालिकेत नगर सेवक म्हणून निवडून गेलेले प्रस्तापित नेत्यांचे बगलबच्चे जनतेने आपल्याला समस्या सोडवण्यासाठी निवडून दिले हेच विसरून गेले असून फक्त प्रस्तापित नेत्यांना खुश करण्यात धन्यता मानत असतात या उलट कोपरगाव शहरातील अनेक जागरूक नागरिक कोणतेही पद नसताना वारंवार सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत आहे
मागील नगर पालिका निवडणुकीत जनतेने निवडणूक हातात घेऊन पैसा पेक्षा विकासाला महत्व दिले हे दिसून येते मात्र दुर्दैवाने निवडून गेल्यावर त्यांनी देखील विकासापेक्षा पैशाला महत्व दिले असून त्यामुळे जनतेला झालेली चूक लक्षात आली मात्र ही झालेली चूक सुधारण्यासाठी आगामी निवडणूक ही नामी संधी असून प्रस्तापित पक्ष व नेत्यांना बाजूला ठेऊन कोपरगाव शहराच्या विकासावर बोलणाऱ्या कृतिशील लोकांनी एकत्र येऊन काम केल्यास कोपरगाव शहरातील जनतेचे विकासाचे स्वप्न निश्चित साकार होऊ शकते त्यामुळे शहर विकास या विषयावर काम करणाऱ्या समविचारी लोकांनी एकत्र यावे असे आवाहन या पत्रकात केले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत