कोपरगाव येथे नगर परिषदेमार्फत विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव येथे नगर परिषदेमार्फत विविध ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण संपन्न

कोपरगाव तालुका प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील रचना पार्क साई सिटी, निवारा परिसरातील दादप्पा कोयटे शाळा, तसेच येवला रोड येथील शाळा क्रमांक १...

कोपरगाव तालुका प्रतिनिधी:-


कोपरगाव तालुक्यातील रचना पार्क साई सिटी, निवारा परिसरातील दादप्पा कोयटे शाळा, तसेच येवला रोड येथील शाळा क्रमांक १० मंगळवार  (दि.५) रोजी कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने व कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आले. या लसीकरण मोहिम सत्रात  कोविशिल्ड व  कोवॅक्सिन या दोन्ही लसीचे पहिला व दुसरा डोस असे लसीकरण करण्यात आले.


याप्रसंगी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, राजेंद्र गाडे, सुनिल आरण, संजय तिरसे, अनिरुद्ध काळे, सोमनाथ आढाव, अश्विनी नरोडे, अनिल गाडे आदी उपस्थित होते.

सदर लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर, डॉ.गायत्री आहेर यांचेसह नंदू नवले, आशा सेविका अर्चना आढाव, मुक्ता गोरे, धरती कुमावत, संगिता पाईक, ऑपरेटर प्रविण पोटे, रामनाथ जाधव, कर्मचारी भरत साबळे, मोहन थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. या लसीकरण मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत