कोपरगाव/प्रतिनिधी:; आर्विक प्रोडक्शन कोळपेवाडी निर्मित ‘माझा ज्ञानोबा’ ह्या मालिकेची निर्मिती करणार्या कोपरगावच्या भूमिपुत्रांचा बुधवारी (त...
कोपरगाव/प्रतिनिधी:;
आर्विक प्रोडक्शन कोळपेवाडी निर्मित ‘माझा ज्ञानोबा’ ह्या मालिकेची निर्मिती करणार्या कोपरगावच्या भूमिपुत्रांचा बुधवारी (ता.6) राष्ट्रसंत जनार्धन स्वामी आश्रमात महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
मायबोली वाहिनीवर अज्ञात सत्य सांगण्याचे धाडस करणारी मालिका ‘माझा ज्ञानोबा’ ही 30 सप्टेंबर, 2021 पासून सुरू झाली आहे. आठवड्यातील गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रात्री 9 वाजता तिचे प्रक्षेपण होते. या मालिकेचे निर्माते जलाल महाराज सय्यद व कोळपेवाडीचे प्रशांत पवार आहेत. पटकथा संवाद जलाल महाराज सय्यद यांनी लिहिलेले आहेत. सहनिर्माते प्रमोद भळगट व शुभम पानगव्हाणे आहेत तर कार्यकारी निर्माते सुमित पवार आहेत. सहपटकथा लेखक सुदर्शन खडांगळे असून, श्याम गोराणे व अरुण महाराज पगारे यांनी संगीत संयोजन केलेले आहे. कला दिग्दर्शक रमेश टिक्कल, पार्श्वगायन रवी महाराज पवार, ज्योती गोराणे, सहसंकलन सागर पवार आणि दिग्दर्शन प्रमोद श्रीवास्तव करत आहेत. या मालिकेत भूमिका करणारे बहुतांश कलाकार हे वारकरीच आहेत. म्हणूनच माझा ज्ञानोबा ही मालिका एक इतिहास घडविणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
‘माझा ज्ञानोबा’ या मालिकेचा प्रसार करून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवी, असे आवाहन महंत रामेशगिरी महाराज व माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी करुन सर्व टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी मनोज कानडे, शंतनू गुळसकर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत