कोविड लसीकरनाचे राजकारण थांबवा"- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोविड लसीकरनाचे राजकारण थांबवा"- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम: गेल्या दीड वर्षांपासून कोविड लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना थेट कोविड लस देण्याची मोहीम सुरू असून या लसीकरणाचे म...

कोपरगाव/वेबटीम:

गेल्या दीड वर्षांपासून कोविड लसीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना थेट कोविड लस देण्याची मोहीम सुरू असून या लसीकरणाचे मोठया प्रमाणावर राजकारण सुरू असून ते त्वरित थांबवावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे 




या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील एक ते दीड वर्षांपासून देशभर कोविड च्या साथीने थैमान घातले आहे मात्र यावर शासनाने सर्वच ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू केली असून गल्लो गल्लो शासनाच्या वतीने कॅम्प आयोजित केले जात आहे मात्र या कॅम्प बाबत अधिकृत माहिती वॊद्यकीय अधिकारी अगर शासनाने प्रतिनिधी म्हणून तहसीलदार व मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी,ग्रामसेवक यांनी देणे आवश्यक आहे तशी अधिकृत माहीती शासन स्तरावर दिली जाते मात्र या अधिकृत माहितीचा गैरफायदा घेऊन स्थानिक राजकीय नेते व गल्लो गल्लीचे पुढारी स्वतःच्या नावाने जाहिरात करून आमच्या मुळेच आपणास लस मिळत आहे असा अपप्रचार करत आहे तसेच अशी खोटी माहिती जनतेमध्ये प्रसारित करून आपला गैर प्रभाव जनतेवर निर्माण करत आहे वास्तविक या लसीकरणाची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असताना अशा प्रकारे स्थानिक राजकीय नेते मंडळींकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे तसेच शासनाच्या योजनेची अशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेत असून व लसीकरणाचे राजकारण थांबवावे अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत