समतानगरमध्ये भुमीगत गटारी व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्या - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समतानगरमध्ये भुमीगत गटारी व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्या

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील समतानगर परिसरात भूमिगत गटारी व चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अडचणी येत असून समतानगरमध्ये ...

कोपरगाव प्रतिनिधी:-

कोपरगाव शहरातील समतानगर परिसरात भूमिगत गटारी व चांगल्या दर्जाचे रस्ते नसल्यामुळे नागरिकांना अडचणी येत असून समतानगरमध्ये भूमिगत गटारी व रस्ते सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


      कोपरगाव नगरपालिका प्रभाग क्र.१ च्या समतानगरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहत तयार झाली आहे. मात्र त्या प्रमाणात नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा मिळत नाही. या परिसरात भूमिगत गटारी नसल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर साचून डासांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे अनेक साथीच्या आजारांचा फैलाव होऊन नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांची देखील अवस्था अतिशय वाईट झाली असून जेष्ठ नागरिक व लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीची दखल घेऊन समता नगरमध्ये सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, वाल्मिक लहीरे, दिनेश पवार, मुनीर सय्यद, मनोज डोखे, किरण बागुल, सौरभ गायकवाड, शमीन शेख, नरेश लाडे, रेखा जगताप, निता डाके, मीना गिरमे, पूनम पाटोळे, रत्ना पाठक, पुष्पा लाड, योगिता भांगे, मनिषा डाके, लक्ष्मी शिंदे, सविता कापडे, बेबी वाकचौरे, किशोर डोखे आदि उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत