राहुरी फॅक्टरीतील लैला-मजनूची लॉजवर एन्ट्री! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील लैला-मजनूची लॉजवर एन्ट्री!

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- प्रेमाच्या आणाभाका घेऊन राहुरी फॅक्टरी येथील प्रेमीयुगल जोडप्याने एकमेकांना भेटण्यासाठी एका लॉजवर  नियोजन करून त्य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


प्रेमाच्या आणाभाका घेऊन राहुरी फॅक्टरी येथील प्रेमीयुगल जोडप्याने एकमेकांना भेटण्यासाठी एका लॉजवर  नियोजन करून त्या ठिकाणी पोहचलेही. मात्र 'लॉजभेटीची'  कुणकुण ' त्या' तरुणीच्या घरच्यांना लागताच त्यांनी लवाजमासह रागाने लालबुंद होत लॉज गाठला. मात्र क्षणाचा विलंब न करता शातीर प्रेमविराने खुशकीच्या मार्गाने बाहेर पडून प्रेयसीला सुखरूप घराच्या आसपास पोहोच केले. मात्र  प्रेमविर अद्याप बेपत्ता असल्याने या प्रकरणाची राहुरी फॅक्टरीत खमंग चर्चा सुरू आहे.


राहुरी फॅक्टरी येथे सुरू आलेल्या खमंग चर्चेतुन समजलेली माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी येथील प्रेमीयुगलांनी शुक्रवारी एकमेकांना भेटण्याचे ठरविलं. त्यानुसार नगर-मनमाड मार्गावरील लॉजवर एकत्रित येण्याच निश्चित केलं. ठरलेल्या वेळेनुसार प्रेमविर पोहचला व काही वेळात ती तरुणी रिक्षाने पोहचली. दोघांनी लॉजमध्ये एन्ट्री केली.  दुसरीकडे आपली मुलगी एका मुलासोबत लॉजवर गेल्याची कुणकुण तरुणीच्या घरच्यांना लागली. त्यांनी तातडीने लवाजमासह लॉजवर दाखल झाले.  याचवेळी तरूणाने शक्कल लढवित मित्रपरिवाराच्या मदतीने चारचाकी वाहन लॉजच्या पाठीमागे बाजूला लावून तरुणीला तातडीने घरी पोहच केले. एकड तरुणीचे भाऊ व त्याचे मित्र लॉज पालथे घालत होते. याच दरम्यान तरुणीच्या घरून फोन आला 'ती' घरी आली आहे. 


त्यानंतर रागाचा पहारा चढलेल्या तरुणीच्या भावाने व त्याच्या मित्राने घरी पोहचून तरुणीला चोप दिला. 

त्यानंतर त्यांनी तरुणाच्या घरी दाखल होत घरच्यांना दमबाजी केली. मात्र सदर तरुण फॅक्टरीतून गायब आहे. तरुणीचे नातेवाईक त्याचा शोध घेत आहे.प्रेमाच्या 'लॉजभेटीची' चर्चा सध्या राहुरी फॅक्टरी परिसरात जोरदार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत