मानोरीत खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मानोरीत खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-       राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खाजगी सावकाराच्या ञासाला कंटाळून एका शेतक-याने विषारी ओषध प्राशन करून आत्महत...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

     राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात खाजगी सावकाराच्या ञासाला कंटाळून एका शेतक-याने विषारी ओषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.त्यांची प्रकृती चिंताजनक असुन अहमदनगर येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे.त्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक दखल घेणार की टाकळीमियाँ व राहुरी फँक्टरी येथिल खाजगी सावकारकी प्रमाणे मानोरी येथिल प्रकरण वाऱ्यावर सोडणार का? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. 

  मानोरी येथील शेतकरी ज्ञानदेव विठ्ठल शेळके यांनी शुक्रवारी विषारी ओषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्यांना तात्काळ रूग्णांलयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.त्यांच्या जवळ  एक चिठ्ठी लिहून सापली आहे. या चिठ्ठीमधे सावकारकी बाबत लिहले आहे.हि चिठ्ठी राहुरीचे पोलीस निरीक्षक यांच्या नावाने लिहलेली आहे. चिठ्ठीत मी स्वतः ज्ञानदेव विठ्ठल शेळके राहणार मानोरी ता.राहुरी जबाब लिहुन देतो की,मी तीन वर्षांपूर्वी मानोरी गावातील चार लोकांकडून व्याजाने पैसे घेतले आहे.त्याचे आजपर्यंत व्याज दिले आहे.त्या लोकांना मी स्टेट बॅंकेचे चेक दिलेले आहे.सदर लोकांनी मला वारंवार पैक्षाची मागणी करूण मानसिक ञास दिला.त्यांच्या ञासाला कंटाळून मी आज रोजी आत्महत्या करीत आहे.यात माझ्या कुटूंबियाची  कोणताही चुक नाही. त्यांना कुनीही ञास देऊ नये अशी विनंती केली आहे.  मी मेल्यानंतर माझ्या कुटूंबियांना ञास देऊन नये पैक्षाची मागणी करूण ञास देतील तरी त्यांच्या पासून माझ्या कुटूंबियांचे संरक्षण करावे.या तिन्ही सावकारांना मी मुद्दल रक्कम पेक्षा जास्त व्याज दिले आहे.तसेच माझे बंधू सोपान व रामदास यांना विनंती आहे की,आपल्या आईचा (बाई) सांभाळ करावा व तीचा शेवट गोड करावा हीच माझी शेवटची इच्छा हि विनंती. माझ्या आत्महत्यास कोणालाही जबाबदार धरू नये 

अशा आशायची चिठ्ठी लिहुन खासगी सावकाराच्या ञासास कंटाळून या शेतक-याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सावकाराचा बळी ठरलेला तो शेतकरी रूग्णांलयात तो शेवटच्या घटका मोजत आहे.त्याने न्यायासाठी पोलीस निरीक्षक यांच्या नावाने चिठ्ठी लिहली आहे. शेतक-याकडुन मुदलीपेक्षा जास्त व्याज खाऊनही ञास देणा-या सावकारावर राहुरीचे पोलीस निरीक्षक काय  कारवाई करतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

      
   राहुरी तालुक्यातील राहुरी फँक्टरी हाँटेल चालकाने सावकाराच्या छळास कःटाळून हाँटेल बंद करून पलायन केले होते तर टाकळीमियाँ येथिल ठेकेदाराने सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यादोन्ही घटनांची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना असतानाही कोणतीही कारवाई केली नसल्याने सावकारांची हिम्मत वाढली आहे.आज मानोरीत शेतकऱ्यांने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.त्या शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु असुन राहुरीचे पोलीस निरीक्षक  काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्षलागले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत