कोपरगाव/प्रतिनिधी:- पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्ती भागात सोमवारी (ता.४) झालेल्या जोरदार पावसाचे पाणी थे...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्ती भागात सोमवारी (ता.४) झालेल्या जोरदार पावसाचे पाणी थेट घरांत घुसले. यास सर्वस्वी पालिका जबाबदार असल्याचा आरोप करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी दिला आहे.
शहरात हद्दीत कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्तीचा नव्याने समावेश झालेला आहे. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी अनेक घरांत साचले. यामुळे नागरिकांना अबालवृद्धांसह रात्र पाण्यातच जागून काढावी लागली.
असा प्रकार उद्भवू नये म्हणून पालिकेला यापूर्वी अनेकदा कळविलेले आहे. परंतु, पालिकेचा उदासीन कारभार शहरवासियांच्या त्रासास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या नागरिकांची सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी भेट घेऊन दिलासा देत पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. जर यावर तोडगा काढला नाही तर पालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील शेख यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत