नगर विशेष प्रतिनिधी:- दि. 19/10/21रोजी सौ विश्रांती शशिकांत शेळके, रा. कर्जत या कर्जत शहरात सायंकाळी महात्मा गांधी विद्यालय समोरून बर...
नगर विशेष प्रतिनिधी:-
दि. 19/10/21रोजी सौ विश्रांती शशिकांत शेळके, रा. कर्जत या कर्जत शहरात सायंकाळी महात्मा गांधी विद्यालय समोरून बरगेवाडी रस्त्याने मुलांना घेऊन रस्त्याने पायी घरी जात असताना त्यांचे पाठीमागून एका मोटर सायकलवर 2 अज्ञात इसम जवळ आले. मोटर सायकल वरील एका इसमाने त्यांच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून तोडून घेऊन पळून गेला. अशा मजकुराची कर्जत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल होताच कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ घटना ठिकाणी तपास पथकातील पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार यांच्यासह घटनास्थळी तातडीने धाव घेतली. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सुरू केला. पोलिस अधिकारी कर्मचारी आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा हा नांदगाव येथील सोमीनाथ तात्या काळे याने केला असल्याचे गोपनीय महितगाराकडून समजल्याने त्याचा वेळोवेळी शोध घेतला असता तो गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. सदरचा आरोपी नांदगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना सापळा लावून मोठ्या शिताफीने मोटरसायकल सह ताब्यात घेतले. सोमीनाथ तात्या काळे याने त्याचे साथीदारा मार्फत सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले असून गुन्ह्यातील चोरलेले मनी मंगळसूत्र काढून दिले आहे. त्यास मा. न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रवीण अंधारे हे करत आहेत. सदर आरोपीकडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे.
*सदरची कारवाई-*
मा.पोलीस अधिक्षक सो.श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा,
अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल,
उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग श्री.आण्णासाहेब जाधव,
यांचे मार्गदर्शनाखाली
कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सतीश गावित, भगवान शिरसाट पोलीस अंमलदार, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे , गोवर्धन कदम , यांनी केली आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत