सोमेश्वर महादेव मंदीरात केंद्रीय पोलीस दलाचे सहाय्यक कमांडन्ट ACP रितेशजी रणधीर आणि प्रा.सुभाषजी रणधीर यांच्या हस्ते पूजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सोमेश्वर महादेव मंदीरात केंद्रीय पोलीस दलाचे सहाय्यक कमांडन्ट ACP रितेशजी रणधीर आणि प्रा.सुभाषजी रणधीर यांच्या हस्ते पूजन

कोपरगाव/वेबटीम:-     श्रीमंत महामहीम पवार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव गावठाण सोमेश्वर महादेव मंदिर(सराफ बाजार) येथे कोपरगावचे भुमी पुत्...

कोपरगाव/वेबटीम:-


    श्रीमंत महामहीम पवार देवास ज्युनिअर संस्थानचे कोपरगाव गावठाण सोमेश्वर महादेव मंदिर(सराफ बाजार) येथे कोपरगावचे भुमी पुत्र व केंद्रीय पोलीस दलाचे सहाय्यक कमांडन्ट ACP श्री.रितेशजी रणधीर आणि त्यांचे वडील प्रा.सुभाषजी रणधीर (उपप्राचार्य एस.एस.जी.एम काॅलेज) यांनी पुजन व आरती केली...


            कोपरगाव येथील आपल्या मायभूमीत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव पुजन प्रसंगी मिळालेले आशिर्वाद समाधान देणारे असून माजी सैनिकांची भेट उर्जा देणारी असल्याची भावना व्यक्त केली... उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते मानाचे पारंपरिक टोपी-उपरणे,श्रीफळ,प्रसाद देवून सन्मान करण्यात आला... तसेच त्यांचे उज्वल यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या... तसेच उपस्थित माजी सैनिक यांचाही सन्मान करण्यात आला...

              श्रीमंत पवार संस्थान सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील,व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.महावीरशेठ शिंगी, श्री.मनोजजी कपोते,श्री.प्रविणशास्री मुळे, ज्येष्ठ नागरिक श्री.उध्दवराव विसपुते,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्री.युवराजजी गांगवे,उपाध्यक्ष

श्री.मारुतराव कोपरे, सचिव,श्री.भाऊसाहेब निंबाळकर,श्री सुकदेवजी काळे,

श्री.वाळे मेजर,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक श्री.विशालजी झावरे,सराफा बाजारचे व्यापारी श्री.परेशशेठ उदावंत,चि.ओम कपोते,श्री.नंदुजी शेंडे(गुरव), पत्रकार श्री.अक्षयजी काळे यांचे सह भक्त उपस्थित होते...या प्रसंगी श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांत घोडके देवस्थानचे कामकाज संदर्भात माहिती सांगून सुत्रसंचलन केले...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत