राहुरी(वेबटीम) राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची बुधवार दि 29 डिसेंबर रोजी कोरोन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जाराज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांची बुधवार दि 29 डिसेंबर रोजी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याबाबत नामदार तनपुरे यांनी स्वता: फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे
ना. तनपुरे यांनी या पोस्ट मध्ये म्हंटले की माझी तब्येत व्यवस्थित आहे. काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत असे तनपुरे यांनी म्हंटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत