कोपरगाव(वेबटीम):- कोपरगाव शहराच्या तीनही बाजूने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पु...
कोपरगाव(वेबटीम):-
कोपरगाव शहराच्या तीनही बाजूने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या असलेल्या पूर्णाकृती पुतळा बरोबरच आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचाही पूर्णाकृती पुतळा बसविला असल्याने तमाम कोपरगाव कराची असलेली अनेक वर्षाची मागणी पूर्ण झालीअसून यासाठी आजी माजी आमदारांबरोबरच विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय लहुजी सेनेचे महाराष्ट्र राज्य सर चिटणीस रामभाऊ पिंगळे यांनी नगराध्यक्ष वहाडणे यांच्या सत्करा प्रसंगी केले.
कोपरगावातील सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षातील नेते मंडळी अण्णाभाऊ च्या शताब्दी वर्षात कोपरगावात भव्य दिव्य पूर्णाकृती पुतुला व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदने आदोलने करून याबाबत ची मागणी शासन स्तरावर करत होते या मागणीची दखल घेऊन नगराध्यक्ष वहाडणे यांनी जातीने या कामात लक्ष घालून हा प्रश्न विशेष बाब म्हणून मार्गी लावला म्हणून या कामाचे श्रेय त्यांना देण्यास वावघे ठरत नसल्याचे ही पिंगळे यांनी म्हंटले आहे कोपरगाव स्मारक समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव , संजय साळवे, अशोक पगारे परशुराम साळवे, अनिल जाधव आदी सदस्य सह पत्रकार बिपीन गायकवाड, सोमनाथ गायकवाड ,दिनेश अहिरे ,राम गोसावी आदींच्या हस्ते पुष्प गुच्छ नगराध्यक्ष वहाडणे यांचा सम्मान करण्यात आला यावेळी स्मारक समिती अध्यक्ष सुखदेव जाधव म्हणाले की ,वहाडणे यांनी सर्व समाजातील समाज बांधवांच एकमत करून स्मारक समितीची स्थापना केली स्मारक समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वास्तू कला विभाग आदी परवानग्या मिळण्यासाठी सर्वा ना बरोबर घेऊन पाठपुरावा केला आणि कोपरगाव च्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून त्यांचा आम्ही स्मारक समितीच्या वतीने सत्कार केला आहे .
तर लहुजी सेना जिल्हाध्यक्ष परशुराम साळवे म्हणाले की गेल्या 20 वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात अण्णाभाऊ च्या पुतळाच्या ठिकाणी भव्य पूर्णा कृती पुतळा व्हावा म्हणून लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले होते त्या मागणी व सर्व सामाजिक संघटनेची मागणी आज पूर्ण झाल्याने आपल्याला आत्मिक समाधान लाभले असून ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी यासाठी लढा दिला त्यांच्या लढ्याला उशिरा का होईना यश आले म्हणून सत्कार करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले सर्व समाजाच्या घटकांनी या पुढे मतभेद विसरून सामाजिक संघटनेचे मतभेद बाजूला ठेवून चांगल्या कामाला एकत्र येण्याचे आव्हान केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अशोक पगारे यांनी केले तर आभार संजय साळवे यांनी मांडले.
अण्णाभाऊ ना भारतरत्न देण्यासाठी कोपरगावातील आजी माजी आमदारांनी पुढाकार घ्यावा :-कोपरगाव शहरात सर्व राजकीय सामाजिक संघटनांनी पाठपुरावा केल्याने पूर्णाकृती पुतळा कोपरगाव शहरात आला अण्णाभाऊ च्या जन्मशताब्दी वर्षात केंद्र सरकार ने भारतरत्न द्यावा म्हणून आमदार तथा संस्थांनचे अध्यक्ष आशुतोष काळे यांचे वरीष्ठ स्तरावर वेगळे वजन असल्याने तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचेही वरीष्ठ स्तरावर वेगळे वजन असल्याने त्यांनी शताब्दी वर्षात भारतरत्न देण्यासाठी पुढाकार घेतला तर हा प्रश्न कोपरगावातूनच मार्गी लागला तर महाराष्ट्र तील तमाम जनतेला आनंद झाल्याशिवाय राहणार असेही लहुजी सेनेचे महाराष्ट्र सर चिटणीस रामभाऊ पिंगळे यावेळी म्हणाले.
आपण नगराध्यक्ष हे पद जनतेने दिल्यामुळे जनतेची प्रामाणिक सेवा करणे हे व्रत हाती घेतले असू न सत्ता असो या नसो मात्र एखांद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्यास तत्पर आहोत तर आपल्याला प्रसिद्धी पेक्ष्या काम करण्यातच खरा आनंद आहे.
नगराध्यक्ष विजय वहाडणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत