कोपरगाव(वेबटीम):- मागील काही दिवसांपासून राज्यकर्त्यांना नगर पालिका निवडणुकी चे वेध लागले होते त्यातच कोपरगाव शहरात विकास कामाच्या उदघाटनाने...
कोपरगाव(वेबटीम):-
मागील काही दिवसांपासून राज्यकर्त्यांना नगर पालिका निवडणुकी चे वेध लागले होते त्यातच कोपरगाव शहरात विकास कामाच्या उदघाटनाने वेग धरला मात्र नगर पालिकेच्या अण्णा भाऊ साठे खुले नाट्यगृह याला अपवाद ठरले असून उदघटनाची घाई अन कामाचा पत्ता नाही अशी झाल्याचे दिसून येते असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील साडे चार वर्षात कोपरगाव तालुक्यातील प्रस्तापित नेत्यांच्या श्रेय वादात अनेक विकास कामे रखडली त्याच प्रमाणे काही विकास कामात सत्ताधारी पक्षाला भ्रष्टाचाराचा वास येत होता त्यामुळे या विकास कामाबाबत थेट आरोप प्रत्यारोप होत विकास कामे थेट उच्च न्यायालयात गेली मात्र निवडणुकीचे वेध लागले आणि आश्चर्यकारक रित्या साडे चार वर्षात एकमेकांवर टोकाचे आरोप करण्यात गेले असताना सत्ताधारी व विरोधक व नगराध्यक्ष यांच्यात दिलजमाई झाली व शेवटच्या काळात एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विकास कामाची समझोता एक्सप्रेस जोरात धावू लागली.
कोपरगाव येथील नगर पालिकेच्या खुल्या नाट्य गृहाचे उदघाटन रंगभूमी दिन अर्थात ५ नोव्हे रोजी मानपान नाट्य प्रयोगाच्या धर्तीवर पार पडले लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला नूतनीकरण ठेका दिला गेला पूर्वीचे आरोप प्रत्यारोपाचे रंग धुवून कामाचे उदघाटन यथासांग पार पडले इतर कामानी ज्या प्रमाणे वेग धरला त्या मानाने नाट्य गृहाच्या कामाने कोणताही वेग धरला नाही.
दोन महिन्यांपूर्वी ज्या थाटात विद्यमान आमदार व नगराध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उदघाटन पार पडले तसा कामाने कोणताही वेग धरला नाही.
कोणतेही काम सुरू होताना त्या कामाला लगेच सुरुवात होते मात्र दोन महिन्यांच्या काळात या कामाची कोणतीही सुरुवात नाही अगर कोणत्याच हालचाली या ठिकाणी दिसून येत नाही याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही कदाचित कामाचे उदघाटन होऊन वाटे हिस्से ठरवण्यात यश मिळाले असेल तसेच आगामी निवडणूक जाहीर नाम्याच्या पुस्तिके वर या गुळगुळीत नाट्य गृहाचे फोटो दिमाखात झळकताना दिसतील मात्र आजून तरी हे नाट्यगृह अंतिम घटका मोजताना दिसत आहे पडलेला रंगमंच तुटलेल्या पायऱ्या याची साक्ष देत आहेत .
उद्या नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्याची मुदत संपत आहे प्रशासकीय कार्यकाळ सुरू होत आहे वेळेत आणि दर्जेदार काम व्हावे म्हणून प्रशासक यांनी अडचणी दूर करुन काम सुरू करावे अन्यथा या बाबत लवकरच आंदोलन करण्यात येईल व उदघटनाची घाई अन कामाचा पत्ता नाही या पलीकडे काहीच दिसत नाही असे या पत्रकात म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत