कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहरातील महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापना ५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांन...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहरातील महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापना ५० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी गोसावी बंधूंचा सन्मान केला.
माजी नगराध्यक्ष श्री. मंगेश पाटील व सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री.सुशांत घोडके यांनी महेश वेल्डिंग वर्कस् या आस्थापनेचे मालक श्री.वसंतराव गोसावी परिवारातील श्री.महेशजी गोसावी, श्री.उमेशजी गोसावी, श्री.योगेशजी गोसावी, श्री.गणेशजी गोसावी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आहे.
कोरोना संकटातील दुसऱ्या भयावह लाटेत एक रात्रीचा प्रसंगी, कोपरगावातील काही हाॅस्पिटलचे ऑक्सिजन सिलेंडर संपत आले होते..नगर, औरंगाबाद, संगमनेर अशा ठिकाणी ऑक्सिजन संकलनासाठी गेलेल्या गाड्या यायला उशीर होता...तेव्हा कुठल्याही क्षणी ऑक्सिजन संपून जावून रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकला असता...अशा रात्री गोसावी परिवाराने क्षणाचाही विलंब न करता आपल्या कडील ऑक्सिजन सिलेंडर काढून दिले... आणि बर्याच रुग्णांना जीवदान मिळाले. शिवाय याचा. मोबदलाही त्यांनी घेतला नाही.
आज महेश वेल्डिंग वर्कस् या दुकानाला ५० वर्ष पुर्ण होत असून ५१ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या प्रसंगी जय इंजिनिअरींगचे श्री. अवतारशेठ ऑटोमोबाईल्सचे व्यापारी श्री.अनिलशेठ गुजराथी, विरा पॅलेसचे मालक श्री.राजुशेठ मारवा,माजी नगरसेवक श्री.रमेशजी गवळी, श्री.पिंकीशेठ चोपडा, गणेश भेळचे श्री. सोमनाथशेठ लाडे यांचे सह नागरिक उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत