कोपरगाव/वेबटीम:- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करून त्यांच्...
कोपरगाव/वेबटीम:-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध करून त्यांच्यावरही कडक कारवाई करा, अशी मागणी भाजपच्यावतीने कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे.
याबाबत शहर पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई झाली होती,; त्याचप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे. आता मात्र सावरासावर करताना नाना पटोले म्हणतात कि, मी पंतप्रधान मोदीजी यांच्याबद्दल बोललेलो नसून मोदी नावाच्या एका गुंडांबद्दल बोललो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायाजवळही उभे राहायची पात्रता नसणारे दलबदलू नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अपशब्द वापरूनही कारवाई होणार नसेल तर मीही म्हणू शकतो कि, नाना पटोले नावाच्या गुंडाच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. राहुल गांधी व त्यांचे भंपक अनुयायी प्रसिद्धीच्या नादात देशाच्या पंतप्रधानांचा वारंवार अवमान करत आहेत, असे होऊनही त्याच काँग्रेसचे काही पोरकट गावगन्ना पुढारी पटोलेचेच समर्थन करतील हेही जनतेला माहित आहे, असे नमूद केले आहे. शहर पोलिसांच्यावतीने उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी भाजप कार्यकर्ते मनोहर कृष्णाणी, विनीत वाडेकर, प्रभाकर वाणी, सुरेश कांगुणे, योगेश वाणी, रवींद्र बागरेचा आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत