राहुरी (प्रतिनिधी):- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळाचे दगडूभाऊ गिते यांची तर उ...
राहुरी (प्रतिनिधी):-
राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री. लक्ष्मीनारायण शेतकरी विकास मंडळाचे दगडूभाऊ गिते यांची तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब नरोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे सभासदांनी स्वागत केले आहे.
चिंचविहीरे सोसायटीच्या सभागृहात निवडीसंदर्भात नुतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली. अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे एन.डी.खंडेराय होते.
प्रारंभी दगडूभाऊ गिते यांच्या अध्यक्षपदासाठी सूचक म्हणून उत्तमराव साळवे तर अनुमोदक नामदेव पानसंबळ
होते. बाळासाहेब नरोडे यांच्या उपाध्यक्षपदासाठी सूचक बबन धामोरे तर अनुमोदक म्हणून बाबुराव पठारे होते.
बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने गिते व नरोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुतन अध्यक्ष दगडूभाऊ गिते म्हणाले, राहुरी तालुक्याला सहकार चळवळीचा मोठा वारसा आहे. त्यामुळे याही संस्थेच्या माध्यमातून तो नावलौकिक जपण्याचा प्रयत्न करू. चिंचविहीरे संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीचे लवकरच बांधकाम सुरू करणार आहोत. सभासद व सहयोगी संचालकांनी विश्वास टाकून दिलेली जबाबदारी अत्यंत पारदर्शी कारभारातून दाखवून देऊ, असे
आश्वासन दगडूभाऊ गिते व बाळासाहेब नरोडे यांनी दिले.
यावेळी नुतन संचालक मच्छिंद्र नालकर, गिताराम कोते, शिवाजी गिते, सुखदेव नरोडे, संजय नालकर, सौ. सरस्वती गिते, सौ.भागिरथी झांबरे, मार्गदर्शक सुदाम गिते, माधव नरोडे, सरपंच बाबासाहेब पठारे, उपसरपंच जयराम गिते, हुसेनभाई पठाण, बंडूभाऊ नरोडे, बाळासाहेब गिते, अनिल मुरकुटे, चांगदेव
नालकर, रामनाथ गिते, मारूती नालकर, कुंडलिक नरोडे, कडू झांबरे, रमेश सावंत, सतीश गिते, जिल्हा बँकेचे अधिकारी राजेंद्र शेरकर, सोसायटीचे सचिव बाबासाहेब गिते, आदींसह शेतकरी, सभासद उपस्थित होते. आभार भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप गिते यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत