माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी विकासकामांचा लेखाजोखा लवकर प्रसिध्द करावा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी विकासकामांचा लेखाजोखा लवकर प्रसिध्द करावा

  कोपरगांव प्रतिनिधी:- माजी नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांची कार्य पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे जाहिरही क...

 कोपरगांव प्रतिनिधी:-

माजी नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी पाच वर्षात केलेल्या विकासकामांची कार्य पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे जाहिरही केलेले आहे. आजपर्यंत कुठल्याही नगराध्यक्षांच्या काळात झाली नाहीत इतकी विकासकामे पुर्ण झालेली आहेत, पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पण सर्वच प्रभागात विकासकामे होऊनही जाणीवपूर्वक डोळे झाकून घेतलेल्या काहींना ती कामे दिसत नाहीत हे आश्चर्यच आहे. जनतेसाठी-समाजासाठी काहीही न करता केवळ बातम्यांच्या रतीब घालून स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्यातच काहींना रस वाटतो. काळे-कोल्हे-वहाडणे इ. यांच्या विरोधात बोलायची हिंमत नसल्याने अर्धवट माहितीवर पाणी योजना-विकासकामे-विकासनिधी याविषयी बातम्या देऊन जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग काहीजण करताहेत.




पाच वर्षात विकासकामांत अडथळे आणणाऱ्या नेत्यांविरुद्ध बोलण्याची हिंमत नसणाऱ्यांनी केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी आता उगाचच अर्धवट बातम्यांचा रतीब घालू नये.





 जनतेसाठी कुठलेही आंदोलन-चळवळ-संघर्ष न करता आपण शहरातील जनतेला वेड्यात काढू असा ज्यांचा समज आहे, त्यांनी जरा भानावर यावे. फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदासाठी मुंडावळ्या बांधल्याने जनता स्वीकारीत नसते.




          माजी नगराध्यक्ष श्री.विजयराव वहाडणे यांनी कार्य पुस्तिका प्रसिद्ध करण्याचे जाहिर केलेलेच आहे. प्रसिद्धीसाठी तडफडणाऱ्यांनी जरा वाट पहावी. सत्तर वर्षात पाणी प्रश्न कुणामुळे सुटू शकला नाही? खरे जबाबदार कोण? हे विचारायचे सोडून केवळ शहाजोगपणाच्या गप्पा मारून, बातम्या देऊन जनता भुलणार नाही.



कोल्हे,काळे,वहाडणे,कोयटे, परजणे यांच्याविरुद्ध कधीच स्पष्टपणे बोलायची हिंमत नसेल तर निदान गप्प तरी बसावे. पुर्वी पदावर असतांना जबरेश्वर मंदिराच्या परिसरात काय अन कसा विकास केला याचीही माहिती संबंधितांनी आधी द्यावी. बातम्या देऊन इतरांपेक्षा फक्त स्वतःलाच जास्त कळते असा आव आणू नये असे नरेंद्र मोदी विचार मंचचे प्रसिध्दीप्रमुख विजय बडजाते यांनी म्हंटले आहे.

          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत