राहुरी/वेबटीम:- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सभासद नोंदणी पावती देताना पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवृ...
राहुरी/वेबटीम:-
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सभासद नोंदणी पावती देताना पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती लोखंडे संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत आघाव वरिष्ठ लिपिक माणिक मेहेत्रे व उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी करण्यात यावे असा एक मुखी ठराव राहुरी येथे झालेल्या शिक्षकेतर सेवक संघाच्या सभेमध्ये घेण्यात आला असून एकूण ४९ व्या राज्यस्तरीय शिक्षकेतर सेवकांच्य अधिवेशनात देखील हा विषय मांडला जाणार असल्याचे तसेच हे नामकरण न झाल्यास शिक्षकेतर कर्मचारी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील ठराव संमत झाला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
याबाबत माहिती अशी की रविवार दिनांक 2 जानेवारी रोजी राहुरी येथील प्रगती विद्यालय मध्ये राहुरी तालुका शिक्षकेतर सेवक संघाची सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ लिपिक माणिक मेहेत्रे हे होते तर यावेळी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती लोखंडे पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेक विषयांना हात घालण्यात आला संगमनेर येथे होत असलेल्या ४९ व्या राज्यस्तरीय शिक्षकेतर सेवक यांच्या अधिवेशना बाबत चर्चा होऊन सर्व सभासदांनी अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय मिटिग प्रमाणे कारवाई करण्याचे ठरले तसेच सेवकांचे १०,२०,३०, पदोन्नती बाबत चर्चा झाली शिपाई भरती बाबत व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे नाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सोसायटी असे नामकरण करण्याबाबत ठराव संमत करण्यात आला व असे न झाल्यास आगामी शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीवर शिक्षकेतर कर्मचारी बहिष्कार टाकणार असल्याचे ही सर्वानुमते ठरले. तसेच सोसायटीच्या नामकरणाचा ठराव संगमनेर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
सदर सभेस शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत आघाव सचिव रवींद्र फुगारे उपाध्यक्ष रंगनाथ जाधव सतीश सप्रे भाऊसाहेब जाधव सतीश तेलोरे एन वाय तेलोरे गांधले भाऊसाहेब संतोष गाडेकर सुनील कांबळे विजय नरोडे पत्रकार गणेश विघे अशोक तनपुरे विजय लांबे गणेश इंगळे अनील खर्डे हौशीनाथ बोरडे विजय धनवडे सतीश तनपुरे सौ प्रतिभा कोळपकर सौ प्रमिला गोपाळे श्रीमती चोथे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत