कोपरगाव प्रतिनिधी- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून कारखाना व उद्योग समूहा...
कोपरगाव प्रतिनिधी-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून कारखाना व उद्योग समूहाच्या प्रगतीसाठी स्व.गिरीश जगताप हे आदर्श व्यवस्थापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अकाली निधनाने कारखान्याच्या व्यवस्थापनात मोठी पोकळी निर्माण होऊन कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष तथा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्व.माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या समवेत काम केल्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या स्व.जगताप यांनी १९८० साली असिस्टंट अकौंटंट ते कारखान्याचा कार्यकारी संचालक या ४१ वर्षाच्या सेवेत चिफ अकौंटंट, सेक्रेटरी, जनरल मॅनेजर (शुगर) या पदावर काम करतांना आदर्शवत कामगिरी केली. त्या बळावरच २००१ ते आजपर्यंत त्यांनी यशस्वीपणे कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून अतिशय उत्तमपणे हि जबाबदारी पार पाडली. त्यांचे अकाली निधन मनाला चटका लावून देणारे असले तरी त्यांच्या निधनामुळे कारखाना उद्योग समूहाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सुधाकर रोहोम, संचालक मीननाथ बारगळ, अशोक तीरसे, डॉ.सर्जेराव कोकाटे, सचिन चांदगुडे, आनंदराव चव्हाण,विठ्ठलराव आसने, अरुण चंद्रे,अशोकमामा काळे, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ आदींसह सर्व विभागाचे खातेप्रमुख व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत