कोपरगाव प्रतिनिधी:- मागील दोन वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये केलेल्या योग्य उपाययोजना व नागरि...
कोपरगाव प्रतिनिधी:-
मागील दोन वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये केलेल्या योग्य उपाययोजना व नागरिकांचे मिळालेले अनमोल सहकार्य यामुळे आपण या महामारीचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. दुसरी लाट ओसरल्या नंतर जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपामुळे पुन्हा चिंता वाढल्या असून निष्काळजीपणामुळे कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे यापुढील काळात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे सण उत्सव साजरे करतांना नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असे आवाहन श्री साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.
कोपरगाव येथे नाभिक समाजाच्या वतीने श्री संतसेना महाराज दिनदर्शिकेचे अनावरण आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते कोरोनाचे नियम पाळून करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, नाभिक समाजाला सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लक्ष रुपये निधी दिला आहे. या निधीतून सभामंडपाचे काम लवकरच सुरु होईल. नाभिक समाजाचे प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.
यावेळी नाभिक समाज सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, तालुकाध्यक्ष दिलीप जाधव, सोमनाथ व्यवहारे, सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष विनायक खडांगळे, गोरख वैद्य, दिनेश संत, सचिन वैद्य, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, फकीर कुरेशी, राहुल देवळालीकर, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, संदीप कपिले, प्रताप गोसावी, रिंकेश खडांगळे, विकि जोशी, सागर लकारे, मनोज नरोडे, प्रताप गोसावी, राहुल आदमाने, मुकुंद जाधव, संजय राऊत, गणेश बिडवे, सुरेश कदम, शेखर निकम, देविदास बिडवे, विनायक खडांगळे, संजय सोनवणे, नारायण वाघ, संजय बिडवे, मनोज बिडवे, आकाश वैद्य, दत्तू आहेर, उमेश पगारे, चांगदेव अनर्थे, दीपक बिडवे, विनायक खडांगळे, रावसाहेब जाधव, संदिप बिडवे, विनायक खडांगळे, गणेश बिडवे, आदी मान्यवरांसह नाभिक समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत