देवळाली प्रवरा/वेबटीम:- साई चरित्र पारायण मंडपामुळे आठवडे बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजुने भरलेला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण ह...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
साई चरित्र पारायण मंडपामुळे आठवडे बाजार रस्त्याच्या दोन्ही बाजुने भरलेला असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.माञ देवळाली प्रवरातील एका बड्या राजकिय नेत्याने रस्त्याच्या कडेला भाजीपालाचे दुकान लावले व वाहतुकीस अडथळा ठरल्यावरुन भाजीपाला विक्रेत्याचा भाजीपाला फेकून देवून तराजूवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे.बाजारकरुंवर फुशारकी दाखविण्यापेक्षा आमच्या सारख्या स्थानिकांवर फुशारकी दाखवा जागेवर उत्तर मिळेल असे आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी म्हणले आहे.
शनिवार आठवडे बाजाराचा दिवस त्यात साई चरीञ परायणाचा सप्ताह सुरु झाल्यामुळे बाजारासाठी प्रत्येक व्यापारी जागा शोधुन मिळेल तेथे जागा पकडून भाजीपालाचे दुकान लावत होते.शनिवारी सकाळी 8 वा. शनिमंदीर मार्गे हे राजकीय नेते आपल्या कार्यालयात चालले होते. हाँटेल जय मल्हार समोर गावातील भाजी विक्रेता भाजीपाला विक्रीसाठी मांडीत होता.या नेत्याच्या समोर चाललेल्या गाडीने साईट दिली नाही.त्याचा राग मनात धरुन सदर नेत्यांने स्वतःची गाडी थांबवून भाजीपाला विक्रेत्याचा भाजीपाला रस्त्यावर फेकुन देण्यास सुरवात केली.फेकलेला भाजीपाला भाजीपाला विक्रेता गोळा करीत असताना 'या' बड्या नेत्याने त्या विक्रेत्याच्या तराजूवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
गोरगरिबांबर दहशत करण्याऐवजी आमच्यावर दहशत निर्माण करून दाखवावी- थोरात
यापूर्वीही या नेत्याने रस्त्यावर अनेकांच्या कानफडीत मारली आहे. तरी येथिल नागरीक त्यांना डोक्यावर घेवून नाचतात. येथिल नागरिकांचे मन मोठे असल्याने मोठा भाऊ म्हणून माफ करुन मतदान रुपाने सत्तास्थानही ताब्यात देतात. ज्या नागरीकांच्या जीवावर सत्ता मिळवतात त्यांना पाया खाली तुडविण्याचे काम करतात निवडणूक आली की,यांच्या डोळ्यात पाणी येते.त्यावेळेस नागरीक तथा मतदारांची माफी ही मागतात मतदान रुपाने सत्ता ताब्यात आल्यानंतर पुन्हा मागचे पाढे पुढे सुरु करतात येथिल नागरीक शोसिक आहे.परंतू यापुढे माञ यानेत्याने कोणावरही हात उगरला तर आम्ही सक्षमपणे त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणार आहे.या नेत्याने काळाची पावले ओळखुन वागावे.बाजारकरुंवर फुशारकी दाखविण्यापेक्षा आमच्या सारख्या स्थानिकांवर फुशारकी दाखवा जागेवर उत्तर मिळेल देवळाली प्रवरातील नागरीक तुमचा मान राखतात म्हणून त्यांच्या तोंडात हाणन्याचा प्रयत्न करु नका अन्यायाच्या पाठीमागे रिपाई भक्कमपणे उभी राहणार आहे.त्यामुळे या नेत्याने गरिबावर दहशत करण्याऐवजी आमच्यावर दहशत निर्माण करुनच दाखवावी असे जाहिर आवाहन आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत