कोपरगाव/प्रतिनिधी:; कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवले. याबद्दल शहर शिवसेनेकडून नुक...
कोपरगाव/प्रतिनिधी:;
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तीन चिमुकल्यांचे प्राण वाचवले. याबद्दल शहर शिवसेनेकडून नुकताच सत्कार करण्यात आला.
बुधवारी (ता.१२) बसस्थानक समोर एका कारने अचानक पेट घेतला होता. हा गंभीर प्रकार त्यावेळी तेथून जाणारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचया निदर्शनास आला. त्यांनी प्रसंगावधान राखत पेटत्या कारमधून तीन चिमुकल्यांना बाहेर काढले. या धाडसी कृत्याबद्दल देसले यांचे सर्वत्र कौतुक होत असतानाच शहर शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, जितेंद्र रणशूर, पिंकी चोपडा, आशिष निकुंभ, योगेश अमृतकर आदिंनी त्यांचा सत्कार करून कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत