कोपरगावच्या पोलीस निरीक्षकांनी वाचविले 'त्या' चिमुकल्यांचे प्राण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावच्या पोलीस निरीक्षकांनी वाचविले 'त्या' चिमुकल्यांचे प्राण

कोपरगाव प्रतिनिधी :- कारला आग लागली असता एकच धावपळ आणि कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्यांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी प्रसंगावधान राखून ...

कोपरगाव प्रतिनिधी :-


कारला आग लागली असता एकच धावपळ आणि कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्यांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी प्रसंगावधान राखून बाहेर काढून  त्यांचे प्राण वाचविण्याची घटना घडली.




  कोपरगाव शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या मयूर गेस्ट हाऊस समोर एकाने कार पार्किंग केली होती. या गाडीत तीन लहान मूल बसवून बाजूच्या दुकानात खरेदी करण्यासाठी मुलांचे नातेवाईक गेले असताना या उभ्या असलेल्या कारने अचानक पेट घेतला


यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले हे देवाच्या रूपाने धावून आले अन या पेट घेतलेल्या गाडीतून लहान मुलांना बाहेर काढत शेजारील दुकानात असलेल्या पाण्याच्या जारणे ही गाडी विझवली. यावेळी गाडीचे मालक तसेच माजी शिवसेना प्रमुख भरत मोरे व परिसरातील नागरिकांनी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत