राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका अविवाहित तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील एका अविवाहित तरुणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचार सुरू असून खासगी सावकारीच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे चर्चेतून समजते.
राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा रोडवर वास्तव्यास असलेल्या या तरुणाने एका शेडमध्ये विष प्राशान केले. त्यानंतर त्यास त्रास होऊ लागल्याने शेतातून पळत असताना काहींनी त्यास पाहिले. त्यानंतर विष प्राशन केलेल्या तरुणास तातडीने राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
दरम्यान सदर तरुणाने खासगी सावकारीतून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे चर्चेतून समजते.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाने एका ग्रुपवर खासगी सावकाराचे नाव घेऊन चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वीचा चर्चा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून या व्हिडिओत सदर तरुण, व्यापारी व मध्यस्थी दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत