अहमदनगर/वेबटीम:- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट कर...
अहमदनगर/वेबटीम:-
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.सुजय विखे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वतः खा.विखे यांनी फेसबुकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
माजी मंत्री तथा राहता विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असताना त्यांचे सुपुत्र खा. सुजय विखे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
फेसबुक पोस्ट मध्ये खा.विखे यांनी म्हंटले आहे. काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगिकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची टेस्ट करावी व काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत