राहुरी फॅक्टरी(वेबटीम) देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात ठिकठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवरा परिसरात ठिकठिकाणी कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण(कोविशिल्ड) मोहीम राबविण्यात येत आहे.
आज सोमवार दि 3 जानेवारी 2022 रोजी अष्टविनायक क्लिनिक व वैष्णवी चौक राहुरी फॅक्टरी येथे आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 10 ऑक्टोबर 2021 रोजी सुद्धा वैष्णवी चौकात याचप्रकारे लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती.
आज झालेल्या लसीकरण मोहिमेत जवळपास 148 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.परिसरातील महिलांना तसेच जेष्ठ नागरिकांना इतर ठिकाणी जाणे गैरसोयीचे होऊ नये यासाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने आरोग्यअधिकारी डॉ आण्णासाहेब मासाळ यांना वैष्णवी चौकात लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती. ज्या नागरिकांना आज लस घेता आली नाही त्या नागरिकांसाठी शुक्रवार दि 7 जानेवारी 2022 रोजी पुनश्च लसीकरण मोहीम वैष्णवी चौकात आयोजित करण्यात येणार आहे.
आज झालेले लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देवळाली प्रवराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आण्णासाहेब मासाळ, समुदाय आरोग्य अधिकारी रेखा पंडित, अष्टविनायक क्लिनिकचे डॉ. किशोर वाघमारे, तुळजा मेडिकलचे अक्षय पेरणे, आरोग्य सेविका संगीता जाधव, आरोग्य सेवक विजय बाविस्कर, मदतनीस जुलैखा शेख, वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक वसंत कदम, अध्यक्ष संतोष कराळे,मयूर मोरे,जालिंदर दोंड,धनंजय थोरात,प्रथमेश थोरात,महेंद्र दोंड,सुयोग सीनारे, सुहास वरखडे,संतोष कदम तसेच वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे सर्व सभासद प्रयत्नशील होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत