कोपरगाव/वेबटीम:- नुकत्याच कोपरगाव येथील ' कलश ' मंगल कार्यालयात ट्रडिशनल शोतोकॉन कराटे संघटना महाराष्ट्र राज्य, आयोजित अकराव्या खुल्...
कोपरगाव/वेबटीम:-
नुकत्याच कोपरगाव येथील ' कलश ' मंगल कार्यालयात ट्रडिशनल शोतोकॉन कराटे संघटना महाराष्ट्र राज्य, आयोजित अकराव्या खुल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील 11 संघांच्या वतीने २३१ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल मध्ये शिकत असलेला शिवराज होने याने कतास अणि फाईट या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळविले तर त्याची बहीण कु.राजेश्वरी होने हिने देखील दोन्ही प्रकारात गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळविल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी दोन्ही स्पर्धकांची अगदी लहान वयात दीव- दमन येथे होणार्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या लष्कर दिनाच्या कार्यक्रमात राजेश्वरी व शिवराज या दोघांचा माजी सैनिकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व शाळेचे प्राचार्य व शिक्षक यांनी दोघांचे अभिनंदन केले.या दोन्ही विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अॅडव्होकेट स्नेहल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तर कोपरगाव कराटे संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन पांढरे सर व राजेश्वरी व शिवराज यांची आई अश्विनी होने यांचे सहकार्य मिळाले व या दोन्ही स्पर्धकांना श्री रितेश रणधीर ( ऐ. सी. पी.) तसेच सौ.रुपाली भुतडा मॅडम यांच्या हस्ते मेडल अणि प्रमाणपत्र देण्यात आले. यशस्वी शिवराज अणि राजेश्वरी या दोघांचेही ट्रडिशनल शोतोकॉन कराटे संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने देखील दोघांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कोपरगाव शहर शिवसेनेचे शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,वाहतुकसेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख,युवनेते विक्रांत झावरे,विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे, एम.के.आढाव विद्यालयाचे शालेय कमिटीचे सदस्य बाळासाहेब साळुंके, नितीन राऊत, वैभव गिते,मयूर दळवी,मंगेश देशमुख,महिला आघाडी जिल्हाप्रमुख नगरसेविका सपना मोरे,वर्षा शिंगाडे,उपतालुकाप्रमुख सारिका कुहिरे, शहरप्रमुख राखी विसपुते, उपशहरप्रमुख अश्विनी होने,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतीश शिंगाने,शिवसेनेचे उमेश छुगणी, राकेश वाघ,किरण अडांगळे,योगेश उशीर, गोविंद चव्हाण,रफिक शेख,सतीश खर्डे,भूषण वडांगळे,राहुल वायखिंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत