राहुरीची तनिष्का तागड हिला राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीची तनिष्का तागड हिला राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल

राहुरी (प्रतिनिधी) राहुरीची तनिष्का तागड हिला राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल  मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू असून ति...

राहुरी (प्रतिनिधी)


राहुरीची तनिष्का तागड हिला राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सिल्व्हर मेडल  मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू असून तिच्या ह्या यशाबद्दल तिचे माजी खासदार प्रसाद तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे ह्यांनी सत्कार करून तिला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 दिल्ली येथे  डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या 59 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये (वयोगट 5/7) महाराष्ट्र राज्याकडून खेळणाऱ्या तनिष्का अतुल तागड हीने सिल्व्हर मेडल मिळवले आहे. तसेच कु तनिष्का हिने नोव्हेंबर 2021या महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये   हीने प्रथम क्रमांक मिळवला होता व त्यानंतर तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. तिला स्पर्धेसाठी जाण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे ह्यांनी मोलाची मदत केली व तिला ह्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.


 तनिष्काच्या या यशाबद्दल आज माजी खासदार प्रसाद बाबुराव तनपुरे व माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे यांनी तनिष्काचा त्यांचे निवासस्थानी सत्कार केला. यावेळी तनपुरे शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी बी एन गायकवाड,प्रदीप तनपुरे सर, संतोष निकम सर उपस्थित होते. माजी खासदार प्रसाद तनपुरे व डॉ उषाताई तनपुरे ह्यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 


त्यासोबत तिचे पालक अतुल तागड होते. कु तनिष्का ही  कला शिक्षक  विशाल तागड ह्यांची कन्या आहे.तनिष्काच्या ह्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .तनिष्काच्या या यशामागे तिने आजपर्यंत घेतलेले परिश्रम तसेच तिचे प्रशिक्षक आणि RTSA स्केटिंग ॲकॅडमी चे अध्यक्ष ऋषिकेश राजेंद्र तारडे यांचे मार्गदर्शन आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत