कोपरगाव(वेबटीम) श्री.गो.विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयोगट १५ ते १...
कोपरगाव(वेबटीम)
श्री.गो.विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने वयोगट १५ ते १८वयोगटा करीता शालेय स्तरावर कोविड लसीकरण मोहीम* सुरु करण्यात आली. या प्रसंगी आरोग्य अधिकारी डाॕ.गायश्री आहेर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी प्रास्ताविक केले
या प्रसंगी डाॕ.विकास घोलप यांनी विदयार्थीना लसीकरणा नंतर कोणजी काळजी घ्यायची या विषयी माहीती दिली.संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी कोपरगांव शहरात लसीकरण सर्व प्रथम विदयालयात होत असल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी पुढील काळांत इ.१०वी ची परीक्षा असल्याने लसीकरणाचे जास्त महत्त्व आहे तेव्हा सर्व पात्र विदयार्थीनी यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या प्रसंगी मान्यवराच्या हस्ते लसीकरण मोहीमेतील सहभागी आरोग्य सेविका श्रीमती सुरेखा कुमावत,विजया गायकवाड,पुजा नवले डाटा ऑपरेटर भूषण वडांगळे,दीपक जाधव,कृष्णा राक्षे,व आशा सेविका श्रीमती वैशाली वाघ,मनिषा बोरुडे,मंगल गवळी,सविता गंगुले,धाया सुपेकर,सुवर्णा वायखिंडे आदीचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सहसचिव सचिन अजमेरे, विदयालयाचे पर्यवेक्षक श्री.गायकवाड आर.बी, जेष्ठ शिक्षक श्री.तुपसैंदर डी.व्ही,कोताडे ए.जे.अमृतकर ए.बी,काले ए.के.व्ही.एन कार्ले, रायते यु.एस यांनी आदी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.एस.एन.शिरसाळे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत