देवळाली/वेबटीम:- देवळाली प्रवरातील शेतकऱ्यांवर संक्रांत आली असून महावितरणने शेतीसाठी लागणारे ट्रान्सफार्मर बंद केले आहेत.एकतर हवामान बदलाचा...
देवळाली/वेबटीम:-
देवळाली प्रवरातील शेतकऱ्यांवर संक्रांत आली असून महावितरणने शेतीसाठी लागणारे ट्रान्सफार्मर बंद केले आहेत.एकतर हवामान बदलाचा फटका त्यात रोहित्र बंदचा घाट यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
अनेकांची शेती पिके पाण्यावर असताना अचानकपणे महावितरणने शेतीसाठी लागणारे वीज पुरवठा खंडित करून शेतकऱ्यांवर त्यामुळे संक्रांत ओढवली आहे .भरमसाट असा विजेच्या बिलाचा हप्ता भरा तरच रोहित्रे चालू केले जातील अशी जाचक अट या वेळी महावीतरणने घातली आहे. परंतु हे करत असताना अनेक जण सिंगल फेज मोटर बसून शेतकरी आपले शेतीला पिकांना पाणी देण्याचे काम करत आहे त्याचा फटका रेगुलर वीज वापरून मोटर चालवणाऱ्या शेतकऱ्यांना बसणार आहे.त्यामुळे निश्चितच बिल वसुलीला फटका बसणार आहे व त्यामुळे रोहित्रे लवकर खराब होणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री यांच्या तालुक्यांमध्ये ही परिस्थिती आहे तरी त्यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून वेळेत योग्य ते निर्णय घ्यावेत यासाठी शेतकरी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे याचना करत आहे. एक तर हवामानात झालेल्या बदलामुळे शेती पिकांवर विविध प्रकारचे कीटक व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी पूर्ण हवालदिल झाला असून पिकांवर हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच शेतीसाठी लागणारे रोहित्र बंद केल्याने मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत