कोपरगाव(प्रतिनिधी):- कोपरगाव शहरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मांजावर पोलिसांनी धडक कारवाईचा धडाका सुरू के...
कोपरगाव(प्रतिनिधी):-
कोपरगाव शहरात मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मांजावर पोलिसांनी धडक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुरुवारी (ता.१३) दोन विक्रेत्यावर छापा टाकून नायलॉन मांजा जप्त केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मकर संक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उडविण्यासाठी बालगोपाळांची लगबग असते. यासाठी बाजारपेठेत पतंग, आसरी आणि मांजा विक्रीसाठी उपलब्ध असतो. मात्र, पर्यावरणासाठी हानिकारक असणाऱ्या नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असते. यावर बंदी असतानाही विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. शहरातील सरकारवाडा परिसरात विक्री करणाऱ्या तुळशीदास शिवलिंग पवार (वय ६२) याच्यावर छापा टाकून प्रत्येकी पाचशे रुपयांचे पाच रीळ असा एकूण दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तर जिजामाता उद्यानाजवळील अझहर अबूबकर मणियार याच्यावर गुन्हा दाखल करून 8 हजार 250 रुपयाचा कृत्रिम पक्क्या धाग्यापासून बनविलेला नायलॉन मांजा जप्त केला आहे.
कोपरंगाव शहरात पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने एकाच दिवशी दोन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याने विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत