कोपरगाव(वेबटीम) कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे हद्दीतील सर्व पतंग उत्सव प्रेमी तसेच दोरे विक्रेते यांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी खाली...
कोपरगाव(वेबटीम)
कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे हद्दीतील सर्व पतंग उत्सव प्रेमी तसेच दोरे विक्रेते यांना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी खालील प्रमाणे आवाहन केले आहे.
🧵 *पतंगबाजी करतांना साधा पारंपरिक धागा वापरावा.*
🧵 *नायलाॅन अथवा तंगुस धागा वापरु नये.*
🧵 *विजेच्या तारा पासून सावधानता बाळगावी.*
🧵 *पतंगबाजी करणारे खाजगी इमारतीचा वापर करतात.येथे नायलॉन अथवा तंगुस धागा वापरणारा कोणी आढळून आल्यास पतंगबाजी करणार्याला इमारतीचा मालक अपप्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहे.असा अर्थ काढण्यात येईल व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.*
🧵 *सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाची पथके तैनात केली आहे.*
🧵 *पतंगबाजी करतांना आपण नागरिकांना कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.*
🧵 *पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावे.*
🧵 *कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.*
कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे वतीने मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.*
*- वासुदेव देसले*
*पोलिस निरीक्षक, कोपरगाव शहर पोलिस स्टेशन, कोपरगाव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत