देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे डॉ.वीर यांचे माऊली हॉस्पिटल व विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट यांच्या संयुक्त ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे डॉ.वीर यांचे माऊली हॉस्पिटल व विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार १७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.भागवत वीर यांनी दिली.
आजादी का अमृतमहोत्सव अभियानांतर्गत देवळाली प्रवरातील वीर हॉस्पिटल येथे गुरुवारी सकाळी नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार असून या शिबीरात काचबिंदू निदान व तपासणी राहुरी येथील डॉ.संदीप निमसे करणार आहेत.
शिबिराचे उदघाटन देवळाली प्रवराचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या हस्ते संपन्न होणार असून यावेळी मुख्याधिकारी अजित निकत प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.भागवत वीर व डॉ.प्रीती वीर यांनी केले आहे. आधिक माहितीसाठी 8788173908 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत