कर्जत/वेबटीम:- 'महिला-मुलींना जर कुणी ज्ञात-अज्ञात तत्रास द्याल तर गाठ माझ्याशी आहे.मुलींनी मनात कोणतीही भीती न बाळगता पुढे या, बिनध...
कर्जत/वेबटीम:-
'महिला-मुलींना जर कुणी ज्ञात-अज्ञात तत्रास द्याल तर गाठ माझ्याशी आहे.मुलींनी मनात कोणतीही भीती न बाळगता पुढे या, बिनधास्तपणे तक्रार द्या.तुमच्या तक्रारीबाबत गोपनीयता ठेऊन गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल' असे आवाहन कर्जतचे कृतिशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
कर्जतच्या 'अमरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय व नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मिरजगाव' येथे घेण्यात आलेल्या 'विद्यार्थी संवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.महिला-मुलींच्या सुरक्षीततेसाठी व त्यांच्या मनात असलेली भीती घालवण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांनी वेळोवेळी शाळा-महाविद्यालयात जाऊन हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.कर्जत पोलिसांनी सध्या अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले,'विद्यार्थ्यांनी दुचाकीच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाजात गाड्या महाविद्यालय परिसर व फिरवू नयेत, वाहनचालक परवाना असेल तरच गाडी चालवावी, कॉलेज बाहेरील विद्यार्थ्यांना कॉलेज मध्ये आणू नये, आई-वडील, शिक्षक आणि वडीलधारी मंडळीचा सन्मान ठेवुन त्यांच्या सुचना पाळा. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी व आपले आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सायबर सेल संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले.ज्यावेळी महिला व मुलींवर अन्याय होतो त्यावेळी अनेक मुली झालेल्या त्रासाबद्दल भीतीपोटी वाच्यता करत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा फायदा घेत स्पर्श करण्याचा प्रयत्न होतो, अश्लील हावभाव किंवा वाईट नजरेने खुणावले जाते.बस स्टँड किंवा बसेसमध्ये बसताना मुद्दाम जवळ बसण्याचा व लगट करण्याचा प्रयत्न केला जातो.ओळखीच्या लोकांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडून सुद्धा खूप त्रास मुली आणि महिलांना सहन करावा लागतो. त्रास सहन करावा लागणाऱ्या महिला व मुलींना मिरजगाव दुरक्षेत्र,राशीन दुरक्षेत्र किंवा कर्जत पोलिस स्टेशन येथे म्हणजेच जेथे शक्य असेल तेथे आपली तक्रार देता येईल.ज्यांना शक्य नसेल त्यांना पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपला ९९२३६३०६५२ स्वतःचा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या पी एम सोनवणे, उपप्राचार्य शिवाजी वाघमारे, पर्यवेक्षक साधना पाटील, सहशिक्षक संतोष वाघ, शरद पवार, सुनीता सटाले,मेघना जाधव, गितांजली चिंचकर, दत्ता साळुंके, पवन सिद्धेश्वर तसेच मिरजगाव येथे डॉ ए बी चेडे, कृषी उद्योजक भाऊसाहेब लाढाणे, प्राचार्य डी एम श्रीमंदिलकर, एस जी शिंदे, तुपे, एच आर खिळे, एस के गोरे आदींसह शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
*तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल!*
'होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार करू की नको? समाज,मित्र-मैत्रिणी काय म्हणतील? घरचे काय म्हणतील? आपली शाळा, कॉलेज कायमचे बंद तर होणार नाही ना? हे सगळे विचार मनातून काढा.आता घाबरू नका,तुमचे नाव गोपनीय ठेऊन त्रास देणाऱ्यावर कडक कारवाई करू.
- *चंद्रशेखर यादव,पोलिस निरीक्षक कर्जत*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत