राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी कारखाना येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दोन दुकानांची तर एका क्लिनिकचे कुलूप तोडल्याच्या प्रयत्न झाल्याची...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी कारखाना येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून दोन दुकानांची तर एका क्लिनिकचे कुलूप तोडल्याच्या प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. तर भरदिवसा कपड्याच्या दुकानातून दोन महिलांनी महागाच्या पैठणी साड्या लंपास केल्याची घटना घडली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुरी कारखाना व देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांच्या घटनेत दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. सोमवारी मध्यरात्री ते मंगळवार पहाटच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकांनाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सामनाची उचकापाचक केली आहे. मात्र सुदैवाने कुठलाही मुद्देमाल लंपास केला नाही.
कारखाना कामगार वसाहत येथील सोसायटीच्या गाळ्यात असलेले दीपक टाक यांच्या मालकीचे पद्मावती ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला आहे. बस स्थानक परिसरातील डॉ.फारुख सय्यद यांचे क्लिनिक फोडून चोरट्यांनी सामनाची उचकापाचक केली आहे.तसेच नगर-मनमाड मार्गावर नव्याने सुरु झालेल्या निक्कुज कॅफे या दालनाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये घुसून सामानाची उचकापाचक केली आहे.
द्दरम्यान आज मंगळवारी दुपारी राहुरी कारखाना येथील नगर-मनमाड मार्गालगत असलेल्या गौरव कलेक्शन या कपड्यांच्या दुकानात आलेल्या दोन महिलांनी ४ ते ५ महागाच्या पैठणी साड्या लंपास करून पोबारा केला आहे. सदर चोरी करणाऱ्या दोन महिला सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत.
तर वैष्णवी चौक परिसरातील ज्ञानेश्वर सावळेराम गागरे यांच्या घरासमोरून अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची गाय चोरट्यांनी चोरून नेली आहे.
दरम्यान वरील सर्व घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.
राहुरी कारखाना परिसरात चोऱ्यांचे तसेच गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून राहुरी कारखाना बीटसाठी ४ ते ५ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र हे पोलीस कर्मचारी अपघात झाल्यावर, मोठी घटना घडल्यावर अथवा विशिष्ट बंदोबस्त असल्यावरच पहावयास मिळतात.
राहुरी कारखाना परिसरासाठी ४ ते ५ पोलीस कर्मचारी असले तरी 'असून अडचण, नसून खोळंबा' असे म्हणायची वेळ आली आहे.
एकंदरीत राहुरी कारखाना व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी लक्ष घालावे अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत