कोपरगाव / प्रतिनिधी:- सध्या डिजिटल इंडियाला सरकारकडून प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे कोपरगाव पालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
सध्या डिजिटल इंडियाला सरकारकडून प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यामुळे कोपरगाव पालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिका शहरहद्दीतील घरमालक आणि व्यावसायिकांकडून विविध कर आकारत असते. देशात व राज्यात देखील अनेक ठिकाणी ऑनलाईन कर भरणा सुविधा सुरू झालेली आहे. त्यामुळे कोपरगाव पालिकेने ऑनलाईन कर भरणा सुविधा उपलब्ध करुन द्यावी. यामुळे वसूलही मोठ्या प्रमाणात होण्यास पालिकेला मदत होईल आणि कर्मचार्यांचे परिश्रमही वाचेल असे गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी स्पष्ट केले आहे. यावर पालिका काय निर्णय घेते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत