राहूरी फॅक्टरी(वेबटीम):- राहुरी फॅक्टरी येथील श्री.विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयाच्यावतीने आज़ादी का अमृतमहोत्सव...
राहूरी फॅक्टरी(वेबटीम):-
राहुरी फॅक्टरी येथील श्री.विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयाच्यावतीने आज़ादी का अमृतमहोत्सव या अभियानांतर्गत कोविड-१९ होऊन गेलेल्या राहुरी तालुक्यातील रुग्णांंसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार बुधवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
विवेकानंद नर्सिंग होम येथे होणाऱ्या या शिबिरात कोविड- १९ नंतर जाणवणारी लक्षणे फुप्फुस व हृदयाची कार्यक्षमता कमी होणे, दम लागणे, कोरडा किंवा कफयुक्त खोकला रक्तात गुठळी होणे, कान, नाक, घसा डोळ्याचे विकार, छातीत धडधडणे, रक्तातील व मुत्रातील साखरेचे प्रमाण वाढणे, पोटाच्या तक्रारी, सांधे दुखी, शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे आदींबाबत
आरोग्य तपासणी, मोफत औषधे, पंचकर्म चिकित्सा केली जाणार आहे.
या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. कड व्ही. एस, अधीक्षक डॉ पागिरे बी. आर, उपप्राचार्य
डॉ. बांगर एस. के, डॉ. सोमवंशी आर. आर, डॉ. बोर्डे एम, डॉ. कड यु.व्ही आदींनी केले आहे. नाव नोंदणीसाठी ९४२२९१५४४६/९४०४२५१२४७ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच तपासणीसाठी येताना मागील रिपोर्ट घेऊन येणे आवश्यक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत