राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व तनपुरे कारखान्याचे माजी संचालक गुलाबराव बाबुराव पा. कदम यांचे निधन झा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व तनपुरे कारखान्याचे माजी संचालक गुलाबराव बाबुराव पा. कदम यांचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव कदम हे आजारी होते.त्यांच्या वर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी दुपारी १ वा. देवळाली प्रवरा येथील राहत्या घरी होणार आहे.
त्यांच्या निधनाने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत