कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणेंचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणेंचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम

कोपरगाव  / प्रतिनिधी कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवून कार्यकर्त्याला मदत केली आहे. याबद्दल त्यांचे...

कोपरगाव  / प्रतिनिधी



कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवून कार्यकर्त्याला मदत केली आहे. याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रांतून कौतुक होत आहे.




नगराध्यक्ष वहाडणेयांचा  वाढदिवस नरेंद्र मोदी विचार मंच व भाजपा वसंत स्मृती कार्यालयाच्यावतीने अनोख्या पद्धतीने शनिवारी (ता.२६) साजरा करण्यात आला. स्व.सूर्यभान वहाडणे यांचे जुने सहकारी कार्यकर्ते व स्व. सुशीला वहाडणे यांचे काळातील (१९६६) विद्यार्थी कुतुबुद्दीन अत्तार           (टल्ल्यामामू) यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे जनसंघ, जनता पार्टी व भाजपचे काम केले. ते आता वयानुसार थकलेले असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही जिकिरीचे झालेले आहे.


अशा परिस्थितीत कोपरगाव नगरपरिषदेची करवसुली मोहिम सुरू असल्याने घरपट्टी-पाणीपट्टी भरणेही गरजेचे आहे. कारण जप्तीची नोटिसही आलेली आहे. आर्थिक अडचण असल्याने अत्तार वहाडणे यांना येऊन भेटले. त्यांची बिकट परिस्थिती सहकारी मित्रांना सांगितली. नगरपरिषदेच्या वसुलीच्या कामात हस्तक्षेप न करता सर्वांनी मिळून कुतुबुद्दीन अत्तार यांच्याकडे असलेली नगरपरिषदेची थकबाकी ३० हजार रुपये व शास्ती भरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वहाडणे यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाला दिलासा दिला.


वाढदिवसानिमित्त एका प्रामाणिक कार्यकर्त्याला माणूस म्हणून सहाय्य करण्याचा, आधार देण्याचा उपक्रम राबविला. तसेच यानिमित्ताने नागरिक तर नगरपरिषदेला सहकार्य करताहेतच, परंतु नगरपरिषदेच्या सर्व माजी नगराध्यक्ष, सर्व माजी नगरसेवक यांनी स्वतःकडे थकबाकी असेल तर ती त्वरीत जमा करावी व कुठलाही हस्तक्षेप न करता प्रभागातील नागरिकांनाही कर भरण्यास सांगावे. त्यामुळेच शहरातील विकासकामे वेगाने करणे शक्य- होणार आहे, असे आवाहनही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत