रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये राजभाषा मराठीदिन व विज्ञान दिनाचे संयुक्तीकरित्या उत्साहात साजरीकरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये राजभाषा मराठीदिन व विज्ञान दिनाचे संयुक्तीकरित्या उत्साहात साजरीकरण

कोपरगाव -  शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. २८ फेब्रवारी २०२२ रोजी राजभाषा मराठी गौरव दिन व विज्ञानदिनाचे...

कोपरगाव - 


शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि. २८ फेब्रवारी २०२२ रोजी राजभाषा मराठी गौरव दिन व विज्ञानदिनाचे एकत्रितरित्या 

साजरीकरण करण्यात आले .आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो . अभिनय, भाषणे , संगीत लहरींनी उल्हासित वातावरणात कु . कनिष्का बागुल, कु .साक्षी वाणी , चि . प्रज्वल देशपांडे या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गोडवा आपल्या भाष्यातून व्यक्त केला . तर स्मिता पाटील मॅडम , अमृता मानोरकर मॅडम व दत्ता डोखे सरांनी मराठी भाषेसह कवी कुसुमाग्रजांचा इतिवृत्त सादर केला तर कु .संस्कृती गुरसळ या विद्यार्थीनीने  'ती फुलराणी' नाटकातील मंजुळेची भूमिका साकारत एकपात्री नाट्य सादर केले . तसेच संतोष शेंदूर्णीकर सरांनी  'वऱ्हाड निघालंय 'लंडन'ला!  या नाटकाचा एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली . विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता या बहुआयामी जगात स्वतः ला सिद्ध करण्यासाठी नृत्य, संगीत, कला, क्रिडा व अभिनय  या कौशल्याचाही विकास करावा असाच संदेश या मराठीदिना निमित्त विद्यार्थ्यांना देण्यात आला . तसेच १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक 'चंद्रशेखर वेंकट रामन' यांना मिळाले होते. चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' साजरा केला जातो . या विज्ञानदिनातंर्गत नमिश दगडे, इनया पठान, लब्धी कोठारी , काळे कृष्णकांत, जैन वंश या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली तसेच या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महान शास्त्रज्ञ 'थॉमस अल्व्हा एडीसन ' यांच्या जीवनावर आधारित नाटीका सादर केली . 



विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन  वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने नावीन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शना साठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला . सदर विद्यार्थ्यांना विज्ञानशिक्षक निलेश औताडे सर, आबासाहेब शिंदे सर व प्रीती  शेखो मॅडम यांचे अनमोल मार्गदशन लाभले . अशाप्रकारे  वैविध्यतेने नटलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु . हर्षदा शिंदे, दिव्या शर्मा, नैतिक निकुंभ , अथर्व बूब या विद्यार्थ्यांसह निलेश औताडे सर व नंदिनी वक्ते मॅडम यांनी केले .तर संस्थचे अध्यक्ष श्री. कांतीलालजी अग्रवाल सर, सचिव श्री .संजयजी नागरे सर, विश्वस्त श्री. मनोजशेठ अग्रवाल सर, विश्वस्त श्री. आनंदजी दगडे सर , विश्वस्त सौ . वनिताताई  नागरे,कार्यकारी संचालक आकाशजी नागरे सर, प्रशासक सुरेशजी शिंदे सर, उप -प्राचार्य सोमनाथ सोनवणे सर, प्रविण कदम सर, प्रशांत भास्कर सर आदींनी कार्यक्रमाचे कौतुक करून राजभाषा मराठी गौरव दिन व विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत