राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- कामाचे पैसे मागितले म्हणून राहुरी फॅक्टरी येथील व्यापारी पिता- पुत्रांनी कराळेवाडी परिसरातील एकास जीवे मारण्याची धमक...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
कामाचे पैसे मागितले म्हणून राहुरी फॅक्टरी येथील व्यापारी पिता- पुत्रांनी कराळेवाडी परिसरातील एकास जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात व्यापारी पिता पुत्रांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
कराळेवाडी परिसरातील पोपट लालचंद सेठीया यांनी म्हणले की, १३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास मी फॅक्टरी बस स्टँड येथे पोपट कंतीलाल भंडारी यास माझ्या कामाचे पैसे देऊन टाका अशी मागणी केली असता, मी तुम्हाला पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून शिवीगाळ करत परत मला पैसे मागितले तर तुमचा बेतच पाहिलं असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान शेठिया यांच्या फिर्यादीवरून पोपट कांतीलाल भंडारी व त्याचा मुलगा यश पोपट भंडारी याच्या विरुद्ध दिनांक २२ फेब्रुवारी रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील सदर व्यापारी अवैध गुटखाविक्री प्रकरणी नेहमी चर्चेत असताना त्याने शेठिया यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
व्यापारी भंडारी याच्या अवैध गुटखा प्रकरणी अनेक वेळा पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासक विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहे.मात्र 'अर्थ' पूर्ण संबंधामुळे याकडे सातत्याने कानाडोळा होत गेला आहे.
आता जीवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत या व्यापाऱ्याची मजल गेल्याने कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत