श्रीरामपूर/वेबटीम:- कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी केलेल्या देशद्रोही व असवैधानिक कृत्याबद्दल व संविधान ...
श्रीरामपूर/वेबटीम:-
कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांनी केलेल्या देशद्रोही व असवैधानिक कृत्याबद्दल व संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावणेस विरोध करून अपमान केल्याबद्दल श्रीरामपूर येथे आंबेडकरी विचारांच्या विविध पक्ष व संघटनांच्या वतीने (दि. २६) एकदिवसीय धरणे आंदोलन करून पोलीस निरीक्षक यांजमार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, दि. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमास न्यायाधीश मल्लिकार्जुन गौडा यांना बोलावले असता येथून बाबासाहेब आंबेडकरांचा फ़ोटो जोपर्यंत काढून टाकण्यात येत नाही तोपर्यंत मी झेंडावंदन करणार नाही. न्यायमूर्ती गौडा यांच्या देशद्रोही वक्तव्याचा व कृत्याचा निषेध करत कडक शासन झाले पाहिजे ही मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आली. या धरणे आंदोलनात राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्ती, भिमशक्ती, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भटके विमुक्त संघटना, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रमाता जिजाऊ ब्रिगेड, छत्रपती क्रांती सेना, बहुजन मुक्ती पार्टी, बहुजन क्रांती मोर्चा आदी पक्ष व संघटनांनी सहभाग नोंदवला.
यावेळी एस. के. चौदंते, आर. एम. धनवडे, पोपट, खरात, लक्ष्मण मोहन, एफ. एन. वाघमारे. मिलिंद मोरे, अशोक दिवे, योगेश ससाणे, आण्णासाहेब दाभाडे, पेंटर व्हसाळे गुरुजी, मुश्ताकभाई तांबोळी, पास्टर कर्डक आदी भीम अनुयायी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत