देवळाली प्रवरा(वेबटीम):- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा शहरात आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध रस्त्यां...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील देवळाली प्रवरा शहरात आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध रस्त्यांचे व विकास कामांचे भूमीपूजन सभारंभ आज मंगळवार दिनांक १ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर दुपारी ४ वाजता श्री.समर्थ बाबुराव महाराज पाटील मंदिरात आ.लहू कानडे यांच्या शुहस्ते व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नातून विकास कामांचा सपाटा सुरू असून देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत आज जवळपास १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ तसेच संगमनेर-शिपलापूर- देवळाली- टाकळीमिया अर्थसंकल्पीय ०४ अंतर्गत मंजूर झालेल्या ९९ लक्ष रुपयांच्या रस्त्याचे भूमिपूजन आ.लहू कानडे यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज १ मार्च २०२२ रोजी दुपारी ४ होणार आहे. यानिमित्ताने बाजार तळावरील श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिर येथे सभा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास युवक काँग्रेसचे सचिव करण ससाणे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रभान थोरात, पंचायत समिती सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अंकुशराव कानडे, समनव्यक अमृतराव धुमाळ, सेक्रेटरी संजय पोटे, माजी सभापती वेणूनाथ कोतकर, सरचिटणीस बाबासाहेब धोंडे, सचिव अँड.समीर बागवान आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे, जिल्हा सचिव अजय खिलारी, माजी नगरसेवक वैभव गिरमे, युवक शहराध्यक्ष कुणाल पाटील, समनव्यक राजेंद्र बोरुडे, नानासाहेब कदम, कृष्णराव मुसमाडे, विश्वास पाटील, दिपक पठारे यांच्यासह शाम शिंदे, उत्तमराव कडू, भाऊसाहेब गुंजाळ, जयेश माळी, अशोक कराळे, गोरखकाका चव्हाण, गंगाधर गायकवाड, कुमार भिंगारे, सुखदेव होले, संतोष गुलदगड, भास्कर आढाव, आप्पा झगडे, सुधाकर कराळे, दत्तात्रय चव्हाण, मयूर आडगळे, कारभारी वाळुंज, संजय भास्कर कदम, किरण चव्हाण, सुभाष आदिक, बबनराव मुसमाडे, बाबा चेमटे, तैनूरभाई पठाण, शरदराव चव्हाण, नंदू उल्लारे, दत्तात्रय मुसमाडे, जावेद सय्यद, बाळासाहेब गडाख, सुनील रोकडे, शरद लोखंडे तसेच भागवत पठारे, गोपीनाथ बर्डे, रमेशराव शेटे, बाळासाहेब लोखंडे, सोमनाथ खांदे, भागवत संसारे, बाळासाहेब आढाव, बाळासाहेब पांडुरंग चव्हाण, अशोक पठारे, प्रदिप मुसमाडे, सचिन झिने, दादा मुसमाडे , अतुल कदम, सुनिल गडाख, दिपक पाडळे, विलास संसारे, प्रदिप पंडीत, नितीन वाळके व श्रीरामपूर-राहुरी-देवळाली प्रवरा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.
*या विकास कामांचा शुभारंभ*
👉 देवळाली दवणगाव रस्ता ते झगडेवस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉आंबी स्टोर रस्ता ते मारुती मंदिर रस्ता खडीकरण करणे.
👉आंबी स्टोर रस्ता ते चव्हाण वस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉देवळाली आंबी रस्ता ते पठारे इंग्लिश मिडीयम स्कूल रस्ता खडीकरण करणे.
👉मुसमाडे वस्ती रस्ता ते अशोक कराळे वस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉देवळाली प्रवरा मध्ये हनुमान मंदिर येथे न.पाच्या जागेत सभामंडप बांधणे.
👉गजाबापू तुकाराम मुसमाडे यांच्या वस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे.
👉डुकरे यांचे घर ते आदिनाथ मुसमाडे, मधुकर मुसमाडे वस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉देवळाली प्रवरा शेटेवाडी रस्ता ते सोमनाथ खांदे वस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉बिरोबावाडी जि. परिषद अंगणवाडी शाळेसमोर पेव्हिंग ब्लोक बसविणे.
👉मळगंगा देवी समोर पेव्हिंग ब्लोक व चेनलिंग फेसिंग करणे.
👉देवळाली प्रवरात श्रीरामपूर रस्ता ते शिंदे वस्ती वाडकर सांबरेवस्ती रस्ता खडीकरण करणे.
👉शेटेवाडी राहुरी रस्ता ओढ्यापासून चेमटे हारगुडे वस्तीपर्यंतचा रस्ता खडीकरण करणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत