श्रीरामपूरची अपंग सामाजिक विकास संस्था नेहमीच कार्यात अग्रेसर असते. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरची अपंग सामाजिक विकास संस्था नेहमीच कार्यात अग्रेसर असते.

  श्रीरामपूर/वेबटीम:-   लोकशाही हा भारत देशाचा कणा आहे.सक्षम लोकशाहीकरिता निकोप निवडणूक प्रक्रिया आवश्यक आहे.मतदान करणे राष्टीय कर्तव्य आहे ...

 श्रीरामपूर/वेबटीम:-


 लोकशाही हा भारत देशाचा कणा आहे.सक्षम लोकशाहीकरिता निकोप निवडणूक प्रक्रिया आवश्यक आहे.मतदान करणे राष्टीय कर्तव्य आहे हि प्रक्रिया लोकाभिमूख करण्यासाठी सामाजिक संस्थाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे.त्या करिता श्रीरामपूरची अपंग सामाजिक विकास संस्था नेहमीच अग्रेसर असते.असे प्रतिपादन जिल्हास्तरीय सामाजिक संस्थाच्या बैठकीत उपजिल्हाधिकारि तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी केले.



     भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय,निवडणूक शाखा,अहमदनगर,प्रांत कार्यालय,तहसिल कार्यालय  श्रीरामपूर व अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर यांच्या संयूक्त विद्यमाने  राष्र्टीय मतदार जाग्रूती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी मा.जितेंद्र पाटील व अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन श्री.संजय साळवे यांनी दिली.

       स्पर्धेकरिता विषय १) माझे मत माझे भविष्य २) एका मताचे सामर्थ्य स्पर्धा प्रकार अ) गीत गायन स्पर्धा  

१) संस्थात्मक विभाग :  प्रथम एक लाख, द्वितीय  पन्नास हजार,तृतीय तीस हजार,विशेष पारितोषिक पंधरा हजार

२) व्यावसायिक विभाग : प्रथम पन्नास हजार,द्वितीय  तीस हजार,तृतीय वीस हजार,विशेष पारितोषिक दहा हजार.३) हौशी विभाग : प्रथम वीस हजार,द्वितीय दहा हजार,तृतीय सात हजार पाचशे, विशेष पारितोषिक तीन हजार).

    ब) व्हिडिओ मेकिंग स्पर्धा : संस्थात्मक विभाग :प्रथम दोन लाख,द्वितीय एक लाख,तृतीय पंच्चाहत्तर हजार,विशेष पारितोषिक तीस हजार.२) व्यावसायिक विभाग : प्रथम क्रमांक :पन्नासहजार,द्वितीय  तीस हजार,तृतीय वीस हजार,विशेष पारितोषिक : दहा हजार,३) हौशी विभाग : प्रथम तीस हजार,द्वितीय वीस हजार,तृतीय  दहा हजार,विशेष पारितोषिक : पाच हजार,

      भित्तीचित्र (पोष्टर स्पर्धा) : १) संस्थात्मक विभाग : प्रथम पन्नास हजार,द्वितीय तीस हजार,तृतीय वीस हजार,विशेष पारितोषिक : दहा हजार, २) व्यावसायिक विभाग : प्रथम तीस हजार,द्वितीय वीस हजार,तृतीय दहा हजार,विशेष पारितोषिक पाच हजार, हौशी विभाग : प्रथम  वीस हजार,द्वितीय दहा हजार, सात हजार,विशेष पारितोषिक : तीन हजार,

       घोषवाक्य स्पर्धा : प्रथम  वीस हजार,द्वितीय  दहा हजार,तृतीय सात हजार पाचशे,विशेष पारितोषिक :दोन हजार.

       स्पर्धा सर्वांसाठी खूली आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता १५ मार्च अंतिम तारीख आहे.  अधिक माहितीसाठी व नांव नोंदणी करिता वर्षा गायकवाड सचिव अपंग सामाजिक विकास संस्था,सहर्षा हाॅल,दिव्यांग पूनर्वसन केंद्र,बोंबले पाटील नगर,रासकर नगर जवळ, समोर,श्रीरामपूर मो.९८२२४७१०८९ व ८०१०९२७८९१ यांठिकाणी संपर्क साधावा.श्रीरामपूर तालूक्यातील संस्था,कलाकार,सांस्कृतिक ग्रूप,नाट्य संस्था,विद्यार्थी व विद्यार्थीनींनी जास्तीत जास्त आॅनलाईन सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रांताधिकारी मा.अनिल पवार,तहसिलदार मा.प्रशांत पाटील,निवडणूक शाखा श्रीराममपूर प्रशासनाच्या वतीने व संस्था पदाधिकारी संजय साळवे,वर्षा गायकवाड, डाॅ.सतिश भट्टड,डाॅ.अनिल दूबे,आधिक जोशी,नवनाथ जंगले,सचिन मूळे,सूनिता नागरे,प्रा.डाॅ.शैलेश भणगे, करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत