राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरात तुषार दळवी मित्र मंडळाच्यावतीने गुरुवर्य एकलव्य जयंतीनिमित्त आज मंगळवार दि.१ मार्च रक्तदान शिबिर पार पडले.या शि...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरात तुषार दळवी मित्र मंडळाच्यावतीने गुरुवर्य एकलव्य जयंतीनिमित्त आज मंगळवार दि.१ मार्च रक्तदान शिबिर पार पडले.या शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.
नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या तुषार दळवी मित्र मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जाते आज गुरुवर्य एकलव्य जयंती निमित्त राहुरी शहरातील मेहेत्रे हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर पार पडले या कार्यक्रमास आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे कार्याध्यक्ष पापाभाई बिवाल, वंचित आघाडीचे प्रवक्ते निलेश जगधने, सचिव बाबासाहेब साठे, अरुण दळवी अनिल दळवी, शुभम बिवाल, मुन्ना लहारे, कार्तिक त्रिबंके, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अध्यक्ष महेश उदावंत , कांतीलाल जगधने व तुषार दळवी मित्र परिवार उपस्थित होते.
शिबीर यशस्वीतेसाठी आनंदऋषी रक्तपेढीचे श्री.महानोर व त्यांचा स्टाफ उपस्थित होते. यावेळी शिबिरास डॉ.धनंजय मेहत्रे व डॉ.लक्ष्मण गाडे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत