कोपरगाव/वेबटीम:- वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल टेके यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांची तळमळ होती. ...
कोपरगाव/वेबटीम:-
वारी ग्रामपंचायतचे दिवंगत सदस्य राहुल टेके यांचे सामाजिक कार्य खूप मोठे होते. समाजातील वंचित घटकांबद्दल त्यांची तळमळ होती. त्यांना सर्वच प्रकारची मदत करण्याची त्यांच्यात कसब होती. अशा प्रकारे सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या व्यक्तिंमत्त्वास गेल्या काही महिन्यापूर्वी कोरोनामुळे आपण मुकलो आहे. मात्र, त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा गेली नऊ महिने विविध उपक्रमांनी त्यांचा मित्र परिवार, कुटुंबीय,नातेवाईक व ग्रामस्थांनी सूरु ठेवण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. असे कोपरगाव येथील गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव माने यांनी म्हंटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चँरिटेबल ट्रस्ट व नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( दि. २७ फेब्रुवारी) सकाळी वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबीर संपन्न झाले. या भव्य शिबिरात सुमारे २०० पेक्षा जास्त रुग्णांनी आपली मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
यावेळी जवळपास ५० पेक्षा जास्त रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव येथील गोदावरी दुध संघाचे संचालक उत्तमराव माने होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राहुल दादा टेके पाटील यांची प्रतिमापूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, भाजप दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, सरपंच सतीश कानडे, उपसरपंच मनीषा गोर्डे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पारखे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, प्रकाश गोर्डे, विजय गायकवाड, विवेक टेके, अनिल गोरे, विशाल गोर्डे, नंदा निळे, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, कामगार पतपेढीचे अध्यक्ष अशोक गजभिव, माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके, नामदेव जाधव, दिनेश बोरणारे, नरेंद्र लालवाणी, ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संघटक जनार्दन जगताप, शिवव्याख्याते डॉ. सर्जेराव टेके, राजेंद्र टेके, वसंत टेके, पंडित वीर, महेश टेके, नितीन निकम, भीमा आहेर, धोंडीबा वाकचौरे, तुकाराम मोरे, दौलत वाईकर, फकीर टेके, विलास गोंडे, दत्तात्रय गोंडे, किसन पगारे, रविंद्र टेके, जितेंद्र टेक उपस्थित होते. यावेळी मछिंद्र टेके, मुकुंद काळे, विजय गायकवाड, गोरख टेके, डॉ. सर्जेराव टेके यांनी स्वर्गीय राहुल दादाच्या सामाजिक कार्याच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी तुलसी आय हॉस्पिटलचे डॉ. हर्षल पाठक, शोषल वर्कर खेरूनिशा सय्यद व परिचारिका प्रणाली निळे यांनी रुग्णांची तपासणी केली.
शिबीर यशस्वितेसाठी विजय निळे, चंद्रकांत पाटील, राजेंद्र मुरार, मच्छिंद्र मुरार, शंकर महाराज गोंडे, मधुकर सोनवणे, रघुनाथ आहेर, बापू वाकचौरे, राजेंद्र ठाकूर, अंबादास गिरी, सुरज टेके, प्रथमेश टेके, स्वप्नील टेके, बिपीन टेके, पुरुषोत्तम टेके, साईराज टेके, अनुराग टेके यांच्यासह सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ, कुटुंबीय तसेच वारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, वारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वारी येथील श्री.रामेश्वर विद्यालय, नाद संगीत विद्यालय, राधाराणी कलेक्शन तसेच कोपरगाव येथील आशिर्वाद प्रिटंर्स, साई आर्ट यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र जाधव यांनी केले तर रोहित टेके यांनी आभार मानले.
-------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत