राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरात बस स्टँड परिसरात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शनिवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्या...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी शहरात बस स्टँड परिसरात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शनिवार 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी वंचित आघाडीचे शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, राहुरी तालुका अध्यक्ष संतोष चोळके, अनिल जाधव, पत्रकार अनिल कोळसे, नंदू उल्हारे तसेच वंचित आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत